महाराष्ट्र पोलिसांचे चारित्र्य साफ बिघडले आहे! राम पूर्णेकर यांना ताब्यात घेतल्यावरून संजय राऊत यांचा संताप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेनेचे मानपाडा येथील विभाग प्रमुख प्रदिप पुर्णेकर यांचा मुलगा राम पुर्णेकर याला पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले आहे. राम हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन करायला जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या घटनेवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत महाराष्ट्र पोलिसांवर जोरदार टीका केली आहे. ”पोलीस संशयित आरोपींना ताब्यात घेत नाही, पण राम पूर्णेकरला पोलीस उचलून घेऊन गेले. महाराष्ट्र पोलिसांचे चारित्र्य साफ बिघडले आहे असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर करत पोलिसांवर टीका केली. ”राम पुर्णेकर: मी माझे वडील गमावलेत,मला न्याय हवाय. असा आक्रोश करत राम ,एकनाथ शिंदे यांच्या घराकडे आंदोलन करण्यासाठी निघाला तेव्हा ठाणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. रामने प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्या कटात राजा शिंदे आणि मीनाक्षी शिंदे सहभागी असल्याचे पुरावे दिले, तरी या संशयित आरोपींना ताब्यात घेतले जात नाही. पण राम पूर्णेकरला पोलीस उचलून घेऊन गेले. महाराष्ट्र पोलिसांचे चारित्र्य साफ बिघडले आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Comments are closed.