आदित्य ठाकरे 29 ऑक्टोबरला प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबियांची घेणार भेट, पोलीस आयुक्तांशी करणार चर्चा
शिवसेनेचे ठाण्यातील मानपाडा येथील विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांचे पुत्र राम पुर्णेकर यांना मंगळवारी ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आंदोलन करायला निघालेले असताना पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकारामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे येत्या 29 ऑक्टोबरला पुर्णेकर कुटुंबाची भेट घेणार आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली.
29 ऑक्टोबर
गुरुवार दुपारी ३ वाजता
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ठाण्यात धडक,
प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबियांची भेट आणि पोलिस आयुक्तांशी चर्चा!
पूर्णेकर यांचे खरे मारेकरी अद्याप मोकाट फिरत आहेत!
सोडणार नाही!— संजय राऊत (@rautsanjay61) 27 ऑक्टोबर 2026
आदित्य ठाकरे हे गुरुवारी 29 ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते ठाण्याचे पोलीस आयुक्त यांच्याशी देखील या प्रकरणावर चर्चा करणार आहे. याबाबत संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. ”29 ऑक्टोबर गुरुवार दुपारी ३ वाजता आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ठाण्यात धडक, प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबियांची भेट आणि पोलिस आयुक्तांशी चर्चा. पूर्णेकर यांचे खरे मारेकरी अद्याप मोकाट फिरत आहेत! सोडणार नाही!”, असा इशारा देखील आदित्य ठाकरे यांनी या ट्विटमधून दिला आहे.
29 सप्टेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. पुर्णेकर यांच्या कुटुंबियांनी शिंदे गटाच्या नगरसेविका मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे हे या हत्येमागचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी तसे पुरावेही पोलिसांना दिले आहेत. मात्र पुर्णेकरांच्या हत्येला एक महिना पूर्ण होत आला आहे मात्र अद्याप या प्रकरणी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
Comments are closed.