एलन मस्क यांच्या आलिशान घराची पुन्हा विक्री; किंमत ऐकून थक्क व्हाल!
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. मात्र, सध्या त्यांची नाही तर त्यांच्या अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील बेल-एअर परिसरातील प्रसिद्ध आलिशान घराची चर्चा रंगली आहे. 1990 साली बांधलेले हे आलिशान घर मस्क यांनी 17 दशलक्ष डॉलरला खरेदी केले होते. 2012 साली खरेदी केलेले हे प्रशस्त घर आता 2026 मध्ये तब्बल 49.8 दशलक्ष डॉलर एवढ्या विक्रमी किंमतीत विक्रीसाठी बाजारात पुन्हा उपलब्ध झाले आहे.
दरम्यान 5 ते 6 वर्षांपूर्वी एलन मस्क यांनी आपली स्थावर मालमत्ता कमी करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा देखील त्यांनी आपले असेच एक आलिशान घर चीनमधील प्रसिद्ध नेटईज (NetEase) गेमिंग कंपनीचे संस्थापक विल्यम डिंग यांच्याशी संबंधित खरेदीदाराला विकले होते. 7 बेडरूम आणि 13 बाथरुम असलेली आलिशान मालमत्ता मस्क यांनी तब्बल 29 दशलक्ष डॉलर 262 कोटी रूपयांना विकली होती. आता पुन्हा एकदा तिच मालमत्ता 450 कोटींत विक्रीसाठी उपलब्ध आहे.
सुमारे 1.7 एकर क्षेत्रावर पसरलेल्या या भव्य मालमत्तेचे क्षेत्रफळ सुमारे 20,248 चौरस फूट इतके आहे. या संपत्तीमधून लॉस एंजेलिस शहराची सुंदर क्षितिजरेषा आणि पॅसिफिक महासागराचे विहंगम दृश्य दिसते. या घरामध्ये सुंदर बाग, एक मोठा स्विमिंग पूल, दोन मजली लायब्ररी, तसेच खेळण्यासाठी टेनिस कोर्ट आणि मल्टिपल टेरेस यांसारख्या भन्नाट सुविधांचा समावेश आहे.
या घराची पुनर्विक्रीची किंमत जवळपास 50 दशलक्ष डॉलरवर पोहोचल्यामुळे लॉस एंजेलिसच्या हाय-एंड रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. द बेव्हरली हिल्स इस्टेट्सच्या रयनी विल्यम्स आणि व्हिक्टोरिया रिस्को या नामांकित रिअल इस्टेट एजंट्समार्फत या घराची विक्री प्रक्रिया हाताळली जात असून, टेक जगतातील दिग्गजांची मालकी राहिलेली ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी श्रीमंत खरेदीदारांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
Comments are closed.