इस्रोची आज अंतराळात मोठी झेप

स्वदेशी नेव्हिगेशन उपग्रह ‘एनव्हीएस-03’चे रात्री प्रक्षेपण होणार

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) देशाची नेव्हिगेशन प्रणाली अधिक मजबूत करण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11:51 वाजता जीएसएलव्ही-एफ18 रॉकेटद्वारे बहुप्रतिक्षित नेव्हिगेशन उपग्रह ‘एनव्हीएस-03’ अंतराळात प्रक्षेपित केला जाणार आहे. इस्रोने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये गुरुवारी यासंबंधीची अधिकृत माहिती दिली. जीएसएलव्ही-एफ18 हे भारताच्या जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकलचे (जीएसएलव्ही) 20 वे उ•ाण आहे. जीएसएलव्ही-एफ18 रॉकेट एनव्हीएस-03 उपग्रहाला जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये स्थापित करेल. हे प्रक्षेपण सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून होणार आहे.

नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीमचा तिसरा उपग्रह

एनव्हीएस-03 हा नेक्स्ट जनरेशन नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीमचा तिसरा उपग्रह आहे. याची रचना ‘आयआरएनएसएस’ मालिकेसाठी अखंड नेव्हिगेशन सेवा प्रदान करण्यासाठी करण्यात आली आहे. या उपग्रहाच्या अवकाशातील तैनातीमुळे देशाचे जीपीएसवरील अवलंबित्व कमी होईल. ही नेव्हिगेशन प्रणाली सामान्य जनतेसाठी मोबाईल नेव्हिगेशन, नागरी विमान वाहतूक आणि सागरी नेव्हिगेशनसाठी वापरली जाईल. तसेच लष्कर आणि हवाई दलाच्या सामरिक कार्यांसाठी अचूक आणि सुरक्षित डेटा प्रदान करणार आहे.

Comments are closed.