सिंहस्थ महाध्वज फडकला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दक्षिण गंगा गोदावरीच्या तीरावर शनिवारी दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी सिंहस्थ महाध्वज फडकला. नाशिकचे श्रीरामकुंड येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आणि त्र्यंबकेश्वरच्या तीर्थराज कुशावर्त येथे जगद्गुरू शंकराचार्य श्री विधुशेखर भारती यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण झाले.

विश्वविक्रमी महाआरती

गोदाकाठावरील श्रीरामकुंड येथे सायंकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत साडेसहा हजार आदिवासी बांधवांच्या हस्ते गोदावरीची विश्वविक्रमी महाआरती करण्यात आली. हा अपूर्व सोहळा हजारो भाविकांनी अनुभवत गंगा-गोदावरीचा जयघोष केला.

कुशावर्त तीर्थ वंदना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत कुशावर्त तीर्थ येथे ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात धार्मिक विधी सुरू झाले. त्यांच्या हस्ते धर्मध्वजाचे तसेच गौतमी गंगा-गोदावरी मातेचे पूजन करण्यात आले. विशेष अर्घ्य अर्पण करून त्यांनी गोदामातेची आरतीही केली.

विशेष टपाल तिकीट

महाआरती सोहळ्याप्रसंगी महाकुंभ विशेष टपाल तिकिटांचे अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. शंखनाद, मंगल वाद्यांच्या नादात गंगा-गोदावरी, भगवान त्र्यंबकेश्वर आणि निवृत्तीनाथ यांचा जयघोष करण्यात आला.

Comments are closed.