नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्याचार; फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, दोघांना अटक
नालासोपारा पूर्व परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही आरोपींनी पीडित मुलीला कपड्यांच्या दुकानात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. संतापजनक म्हणजे फोटो आणि व्हिडीओ पीडित मुलीच्या बहिणीला पाठवून तक्रार केल्यास फुटेज सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पेल्हार पोलिसांनी आरोपींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अमन शेख (२४) आणि अरबाज शेख (३०) या दोघांनी पीडित मुलीला कपड्यांच्या दुकानात नेऊन अत्याचार केले. इतकेच नाहीतर या घटनेशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ तिच्या बहिणीला पाठवून पोलिसांत तक्रार केल्यास ते व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. अमन आणि अरबाज या आरोपींना पोलीसांनी अटक करून कोर्टात हजर केले. वसई सत्र न्यायालयाने या दोन्ही आरोपींना ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Comments are closed.