‘काँटे’, ‘शूटआऊट ऍट लोखंडवालाचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘काँटे’, ‘काबिल’, ‘शूटआऊट ऍट लोखंडवाला’, ‘मुंबई सागा’ असे अनेक सुपरहिट चित्रपट बॉलीवूडला देणारे दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. राहत्या घरी अचानक पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

क्राईम ड्रामा आणि ऍक्शन थ्रिलर चित्रपटांसाठी संजय गुप्ता ओळखले जायचे. संजय गुप्ता आणि संजय दत्त यांच्या जोडीने बॉलीवूडला अनेक चर्चित चित्रपट दिले. दोघांनी पहिल्यांदा ‘आतिश’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा दिग्दर्शक म्हणून संजय गुप्ता यांचा पहिलाच चित्रपट होता. त्यानंतर दोघांनी ‘खौफ’, ‘जंग’, ‘कांटे’, ‘मुसाफिर’, ‘जिंदा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. याशिवाय संजय दत्तसोबत ‘प्लान’, ‘शूटआऊट ऍट लोखंडवाला’ आणि ‘दस कहानियां’ यांसारख्या चित्रपटांमध्ये निर्माता आणि लेखक म्हणूनही संजय गुप्ता यांनी काम केले.

Comments are closed.