ट्रम्प इराणवर अण्वस्त्र डागण्याच्या तयारीत, अमेरिकन विश्लेषकांच्या दाव्याने खळबळ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर मोठा हल्ला करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, त्यांनी इराणवर अण्वस्त्र हल्ला करावा, याच्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे प्रचंड दबाव आणत आहेत. त्यामुळे ट्रम्प हे इराणवर येत्या काही दिवसांमध्ये अण्वस्त्र हल्ला करू शकतात, अशी भीती वर्तवण्यात आली आहे.
अमेरिकेतील ज्येष्ठ राजकीय विश्लेषक टी. कर्लसन यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर एक पोस्ट टापून हा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार इराणमधील पिपॅक्स माऊंटन या ठिकाणी अमेरिकेकडून अण्वस्त्र हल्ला केला जाऊ शकतो. याच ठिकाणी इराणने अणुऊर्जा आणि युरेनियम समृद्ध करण्याचा कार्यक्रम पुन्हा सुरू केल्याचा दाट संशय अमेरिकेला आहे. हा परिसर अतिशय कठोर अशा ग्रेनाईट दगडांचा आहे. त्यामुळे तेथे पारंपरिक शस्त्रांचा प्रभाव पडत नाही. म्हणूनच या ठिकाणी अण्वस्त्र हल्ल्याचा विचार करण्यात येत असल्याचे कार्लसन यांनी सांगितले. याशिवाय नेतान्याहू हे सातत्याने ट्रम्प यांना संपर्प करून अण्वस्त्र हल्ल्यासाठी दबाव टाकत आहेत. केवळ इस्रायलमध्ये सत्ता टिकवून ठेवण्यासाठी नेतान्याहू यांना इराण युद्ध सुरू ठेवायचे आहे. ट्रम्प यांच्या मदतीशिवाय नेतान्याहू यांना सरकार स्थापन करणे कठीण आहे, असेही कार्लसन यांनी लिहिले आहे.
अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांना ट्रम्प हटविण्याच्या तयारीत
एकीकडे नेतान्याहू हे प्रचंड दबाव टाकत असताना अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांची डोनाल्ड ट्रम्प हकालपट्टी करू शकतात. यामागे दीर्घकाळ चाललेले इराण युद्ध हे कारण असल्याचे बोलले जात आहे. इराणवर हल्ला करण्यासाठी हेगसेथ यांनीच ट्रम्प यांना चिथावणी दिली होती. 8 महिने झाले तरीही अमेरिकेला इराण युद्धात विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे ट्रम्प त्यांच्यावर नाराज आहेत. हेगसेथ यांच्यासह सह सैन्यदलप्रमुख जनरल डॅन केन यांच्या कारभाराबाबत ट्रम्प माहिती घेत असून लवकरच ट्रम्प त्यांच्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात.
Comments are closed.