आता वन-डेचा ‘रन’संग्राम; आज पहिला एकदिवसीय सामना; न्यूझीलंडच्या उसळत्या खेळपट्टीवर हिंदुस्थानी धुरंधरांची ‘कसोटी’

टी-20 क्रिकेटमधील धावांचा पाऊस आणि चौकार-षटकारांची आतषबाजी मागे पडली आहे. आता रंगणार आहे वन डेचा रणसंग्राम. ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर हिंदुस्थान आणि न्यूझीलंड पुन्हा आमने सामने येणार असून यावेळी दोन्ही संघांसमोर विश्वचषकाच्या तयारीचे मोठे आव्हान असेल. चार दिवसांपूर्वी याच मैदानावर झालेल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने 20 षटकांत 259 धावांचा डोंगर उभारला होता, मात्र  वन डेची खेळपट्टी फलंदाजांसाठी तितकीशी अनुपूल नसेल असे संकेत आहेत.

ईडन पार्पची खेळपट्टी वेगवान आणि उसळी घेणारी म्हणून ओळखली जाते. ऑस्ट्रेलियातील पर्थनंतर जगातील सर्वाधिक उसळी घेणाऱ्या मैदानांमध्ये तिचा समावेश केला जातो. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळाल्यास फलंदाजांची खरी परीक्षा पाहायला मिळणार आहे. विशेषतः पुढील वर्षीच्या विश्वचषकासाठी तयारी करणाऱया दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे.

रोहित–विराटकडे चाहत्यांचे लक्ष

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीवर हिंदुस्थानी चाहत्यांचे लक्ष असेल. न्यूझीलंडच्या वेगवान आणि उसळी घेणाऱया खेळपट्ट्या वर हे दोघे कशी फलंदाजी करतात, याची चाचपणी या मालिकेत होईल. दुसरीकडे, गेल्या दोन एकदिवसीय विश्वचषकांतील बाद फेरीत हिंदुस्थानकडून पराभव स्वीकारलेल्या न्यूझीलंडला ताकद दाखवण्याची संधी आहे.

बुमरा, हार्दिकची उणीव जाणवणार

हिंदुस्थानला जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्या यांची उणीव जाणवणार आहे, मात्र श्रेयस अय्यरचे पुनरागमन संघासाठी दिलासादायक ठरेल. अक्षर पटेललाही अंतिम संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडला डेव्हॉन का@नवेच्या दुखापतीचा फटका बसला आहे. हिंदुस्थानविरुद्ध सरावादरम्यान मॅट हेन्रीशी धडक झाल्याने का@नवेला पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुकावे
लागू शकते.

जग कपची रंगीत प्रशिक्षण

हिंदुस्थानने नुकत्याच झालेल्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी निर्णायक आघाडी घेतली होती, मात्र आता परिस्थिती वेगळी असेल. टी-20 मधील फटकेबाजीपेक्षा वन डेमध्ये संयम, तंत्र आणि गोलंदाजीतील अचूकता महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे ईडन पार्पवरील हा सामना विश्वचषकाच्या दिशेने दोन्ही संघांची ताकद तपासणारा ठरेल. या मालिकेला एक प्रकारे वर्ल्ड कपची रंगीत तालीम म्हणावे लागणार आहे.

हिंदुस्थानचा संभाव्य संघ

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्ंधर), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), नमन धीर, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

न्यूझीलंडचा संभाव्य संघ

विल यंग, टिम सेफर्ट / हेन्री निकोल्स, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), मायकेल ब्रेसवेल, मिचेल सॅण्टनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, कायल जेमिसन, मॅट हेन्री/ ब्लेअर टिकनर, जेकब डफी.

Comments are closed.