अमिताभ यांच्या ‘जलसा’वर हल्ल्याची धमकी; दिलजीतच्या कार्यक्रमातही बॉम्बस्फोटाचा इशारा, मुंबईत सुरक्षा यंत्रणा सतर्क

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील ‘जलसा’ बंगल्यावर कार बॉम्बने हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ यांच्या मुंबईतील आगामी कॉन्सर्टमध्ये आयफोन बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या धमकीमुळे मुंबईत सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

मुंबई महापौर कार्यालयाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला. या ई-मेलमध्ये अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यावर कार बॉम्बने हल्ला करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय दिलजीत दोसांझ यांच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये आयफोन बॉम्बचा वापर करून हल्ला करण्याची धमकीही देण्यात आली आहे असे वृत्त आज तकने दिले आहे.

धमकीचा ई-मेल मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. स्थानिक पोलीस आणि बॉम्बशोधक व नाशक पथकाने संबंधित ठिकाणी धाव घेत तपासणी केली. हा ई-मेल नेमका कोणी पाठवला, तसेच त्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेतला जात आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणच्या सुरक्षेचाही आढावा घेतला जात आहे.

दरम्यान, मुंबईत सेलिब्रिटींना धमकी देण्याच्या घटनांमध्ये यापूर्वीही वाढ झाल्याचे समोर आले आहे. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर जुहू परिसरात गोळीबार करण्यात आला होता. रात्री सातच्या सुमारास फुटबॉल खेळून घरी परतत असताना तिघांनी त्याच्या गाडीवर गोळ्या झाडल्या. या घटनेत टायगर श्रॉफ सुखरूप बचावला; मात्र त्याचा चालक आणि रस्त्यावर उभा असलेला एक चाहता जखमी झाले होते. या दोघांवर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता ठीक आहे.

Comments are closed.