वातावरणात गारवा वाढतोय, अशी घ्या आरोग्याची काळजी!
सध्या सकाळच्या वातावरणात हळूहळू थंडीची चाहूल लागली असून गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. ऋतू बदलाच्या या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढतो. त्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच आरोग्याची काळजी घ्यायला हवी.
ताजे आणि पौष्टिक अन्न
हिवाळ्यात ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा.
पाण्याचे सेवन
थंडीच्या दिवसांत तहान कमी लागते, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. यासाठी दिवसभरात कोमट पाणी पिण्यावर भर द्यावे.
ड्रायफ्रुट्स आणि सूप
शरीराला उष्णता मिळण्यासाठी बदाम, अक्रोड यांसारखे सुकामेवा आणि गरम सूपचे सेवन करावे.
त्वचा आणि केसांची काळजी
त्वचा कोरडी पडणे ही या दिवसातील एक सामान्य समस्या आहे. त्वचा मऊ ठेवण्यासाठी आंघोळीनंतर मॉइश्चरायझर, कोल्ड क्रीम किंवा खोबरेल तेलाचा वापर करावा. खूप जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे, कारण यामुळे त्वचेतील ओलावा कमी होऊन ती अधिक कोरडी पडू शकते.
शारीरिक हालचाली
हिवाळ्यात अल्हाददायक वातावरणामुळे आळस वाढतो, परंतु नियमित व्यायाम किंवा योगासने करणे सोडू नये. व्यायामामुळे शरीराभरातील रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरात उष्णता टिकून राहण्यास मदत होते.
हेही वाचा – फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता खालावतेय? घराबाहेर पडताना या गोष्टी लक्षात ठेवा
Comments are closed.