शाळकरी मुलींना अंधारात उतरवणारे चालक, वाहक निलंबित

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱया दोन शाळकरी मुलींना रात्री अंधारातच रस्त्यावर उतरवणाऱया चालक आणि वाहकाला निलंबित करण्यात आले आहे. भंडारा येथून मुंढरी येथे जाणाऱया दोन शाळकरी मुलांना एसटी बसचे वाहक उदेभान मेश्राम आणि चालक अनिल सावरे यांनी रात्री अंधारात अर्ध्या मार्गातच उतरवले होते.

बसमध्ये केवळ दोन प्रवासी असल्यामुळे या मुलींना रोहा गावात उतरवत बस पुढे मुंढरीला न नेण्याचा निर्णय चालक आणि वाहकाने घेतला. यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशी घटना पुन्हा घडल्यास संबंधितांना थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

Comments are closed.