उपनगरची जिल्हा अजिंक्यपद कबड्डी आजपासून

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ज्या स्पर्धेत चढाया-पकडींचा खेळ पाहून खेळाडूंची जिल्हा संघटनेत निवड केली जाते ती मुंबई उपनगर कबड्डी संघटनेची 44 वी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 20 ते 30 नोव्हेंबरदरम्यान रंगणार आहे. शिवसेना शाखा क्र. 123 आणि सुधीर मोरे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कबड्डी स्पर्धा होणार आहे.

विक्रोळीच्या पार्कसाईट येथील कैलास संकुलातील पालिका मैदानावर रंगणाऱ्या या स्पर्धेत प्रथम श्रेणी पुरुष, द्वितीय श्रेणी पुरुष, महिला आणि पुरुष व्यावसायिक गटांतील संघ आपले कौशल्य पणाला लावतील. मुंबई उपनगरातील नामांकित संघांच्या सहभागामुळे चुरशीच्या लढतींची मेजवानी कबड्डीप्रेमींना मिळणार आहे. या स्पर्धेच्या दिमाखदार आयोजनाची जबाबदारी युवा नगरसेवक सुनील मोरे यांनी घेतली आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनाला युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे, मुंबई उपनगर कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तिकर आणि कार्याध्यक्ष सुधाकर घाग उपस्थित राहणार आहेत.

Comments are closed.