'गगनयान'ची तयारी अंतिम टप्प्यात

डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये प्राथमिक प्रक्षेपण चाचणी

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम ‘गगनयान’च्या पहिल्या मानवरहित उ•ाणाची (जी-1) तयारी अंतिम टप्प्यात आहे. गगनयान डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारी 2027 च्या सुरुवातीला प्रक्षेपित होणार असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी बुधवारी सांगितले. श्रीहरिकोटा येथील दुसऱ्या प्रक्षेपण तळावरून प्रक्षेपित होणारे हे उ•ाण, क्रू आणि सर्व्हिस मॉड्यूलला अंतराळात पाठवेल. क्रू मॉड्यूलच्या सुरक्षित परतीची चाचणी घेणे हा याचा प्राथमिक उद्देश आहे. ‘व्योममित्र’ हा मानवाकृती रोबोट पहिल्या टप्प्यात प्रक्षेपित केला जाणार नाही, परंतु त्याला दुसऱ्या उ•ाण चाचणीवेळी पाठवले जाणार आहे. पहिली दोन उ•ाणे यशस्वी झाली, तर भारतीय अंतराळवीर मार्च 2028 पर्यंत तिसऱ्या उ•ाणात अंतराळात प्रवेश करतील. ही मोहीम पूर्ण झाल्यावर अमेरिका, रशिया आणि चीननंतर अंतराळात मानव पाठवणारा भारत हा चौथा देश बनेल.

Comments are closed.