तपासात मदत करण्यासाठी लाचेची मागणी; व्ही. पी. रोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अॅण्टी करप्शनच्या जाळ्यात
तपासात मदत करतो, असे सांगत प्रत्येकी 25 हजार रुपये असे एकूण 50 हजार रुपयांची मागणी करून ती लाचेची रक्कम व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यातील पर्यवेक्षक उपनिरीक्षक हरेश्वर शेंडे (26) यांच्या सांगण्यावरून एका अंमलदाराने स्वीकारली, मात्र अंमलदारास ट्रपचा संशय आल्याने ते पैशांसह पळून गेले. याप्रकरणी ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने शेंडे यांना ताब्यात घेतले.
व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात दाखल एका गुह्यात हरेश्वर शेंडे हे तपासी अधिकारी होते. तपासात मदत करतो, मोबदल्यात प्रत्येकी 25 हजार प्रमाणे 50 हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी शेंडे यांनी केली. पण संबंधितांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी ऍण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली. त्यानुसार ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने तक्रारीची खातरजमा केल्यानंतर त्यात तथ्य आढळून आले. त्यामुळे पथकाने बुधवारी सापळा रचला. त्यावेळा शेंडे यांच्या सांगण्यावरून तक्रारदारांकडून पोलीस शिपाई धनंजय वायसे यांनी 50 हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. मात्र वायसे यांना ट्रप लागल्याचा संशय आला आणि त्यांनी लगेच पैशांसह तेथून पळ काढला. परिणामी शेंडे यांना ताब्यात घेण्यात आले.
Comments are closed.