एस्मेक इक्विपमेंट कंपनीत भारतीय कामगार सेनेचा भगवा फडकला, कंत्राटी आणि कायमस्वरूपी कामगारांनी सदस्यत्व स्वीकारले, कंपनीच्या गेटवर नामफलकाचे अनावरण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पालघर वाडा येथील एस्मेक इक्विपमेंट प्रा. लि. या कंपनीतील कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी कंपनीच्या मुख्य द्वाराजवळ भारतीय कामगार सेनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी तसेच संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहचिटणीस दिनेश पाटील व कार्यकारी सदस्य किरण भोईर यांच्या प्रयत्नाने एस्मेक इक्विपमेंटमधील सर्व कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ भारतीय कामगार सेनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी भारतीय कामगार सेना सदैव तत्पर राहील अशी ग्वाही संजय कदम यांनी भाषणात दिली.

यावेळी सहसंपर्क प्रमुख निलेश गंधे, पालघरचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश केणे, तालुकाप्रमुख निलेश पाटील, शहरप्रमुख प्रमोद भोळप, नवनीत ठाकरे यांच्यासह चिटणीस सूर्यकांत पाटील, सहचिटणीस किरण मालप, मिलिंद तावडे, विजय शिर्पे, विजय तावडे उपस्थित होते. याशिवाय कंपनीच्या युनिट कमिटीचे विजय ठाकरे, संतोष विश्वकर्मा, अल्ताफ शेख, जयप्रकाश निषाद, उदयराज यादव यांच्यासह वाडय़ातील इतर कंपनीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.