NZvsIND: बुमराहची कसोटी क्रिकेटमध्ये कमाल! दोन्ही डावांच्या पहिल्याच षटकात विकेट घेत दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

न्यूझीलंड विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना वेलिंग्टन येथे खेळला जात आहे. १९ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ३६८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ७२० धावांचा डोंगर उभारला. चौथ्या दिवशी भारताने डाव घोषित केल्यानंतर न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने विशेष कामगिरी केली.

बुमराहने एक अनोख्या विक्रमाच्या यादीत प्रवेश केला, जेथे तो केवळ तिसराच भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावातील पहिल्याच षटकात कर्णधार टॉम लॅथमला शून्यावर बाद केले. पहिल्या डावातही लॅथम बुमराहच्या षटकात धावा न काढता बाद झाला होता. त्यामुळे बुमराहाचा एका विशेष यादीत समावेश झाला आहे.

बुमरहाने कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही डावांच्या पहिल्या षटकात विकेट घेण्याची कामगिरी केली. त्याच्याआधी हा पराक्रम एस श्रीसंत आणि झहीर खान यांनीच केला होता. श्रीसंत हा कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांच्या पहिल्या षटकात विकेट घेणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला होता. त्याने २००६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ही कामगिरी केली होती.

कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत पहिल्या षटकात विकेट मिळवणारे भारतीय गोलंदाज
एस श्रीशांत – वि विंडीज, किंग्स्टन, 2006
झहीर खान – बांगलादेशविरुद्ध, मीरपूर, २००७
जसप्रीत बुमराह – न्यूझीलंडविरुद्ध, वेलिंग्टन, २०२६

बुमरहाने या कसोटी सामन्यात प्रभावी कामगिरी सुरूच ठेवली आहे. त्याने पहिल्या डावात २९ षटकांत ९२ धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या होत्या. यादरम्यान त्याने ८ निर्धाव षटकेही टाकली होती. दुसऱ्या डावातही त्याने आतापर्यंत ९ षटके टाकली असून, ३३ धावा देत १ विकेट घेतली आहे.

सामन्याचा धावफलक
न्यूझीलंडचा पहिला डाव ३६८/१०
भारताचा पहिला डाव ७२०/९ (घोषित)
न्यूझीलंडचा दुसरा डाव ११९/२
(चौथ्या दिवसाचा खेळ संपला)

Comments are closed.