पुण्यात न्यायालयाबाहेर रक्तरंजित थरार; आधी पिस्तूलातून गोळीबार, मग कोयत्याने तरुणाचे हात छाटले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाबाहेर बुधवारी भर दिवसा गोळीबार करण्यात आला. तसेच हल्लेखोराने एकावर कोयत्याने देखील वार करत संबंधित व्यक्तीचे दोन्ही हात छाटले. यात एक जण जखमी झाला आहे. ही घटना कोर्टाच्या 4 नंबर गेटवर घडली.

या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस, गुन्हे शाखेची पथके दाखल झाली आहेत. थेट न्यायालयाजवळ येऊन गोळीबार, कोयता हल्ला झाल्याने पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Comments are closed.