परशुराम घाटात ब्रेक फेल झाल्याने कंटेनरची दुचाकीला धडक; अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कंटेनर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात होऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. लोटे येथून केमिकलने भरलेले ड्रम घेऊन जाणाऱ्या कंटेनरचे अचानक ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला.
ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर रस्त्यावरील दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला गेला. याचवेळी लोटे येथे कामावर जाणाऱ्या दुचाकीस्वाराला कंटेनरने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की, कंटेनर आणि दुचाकी दोन्ही रस्त्याच्या खाली कोसळले.
या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुचाकीस्वाराची ओळख अजून पटलेली नाही. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक व्यवस्थेसह रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
Comments are closed.