एकाच सामन्यात शतक आणि 5 विकेट्स घेत ऐतिहासिक कामगिरी! दक्षिण आफ्रिकेच्या वियान मुल्डरने रचला इतिहास

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू वियान मुल्डरने (Viaan Mulder) एकाच कसोटी सामन्यात शतक झळकावून आणि गोलंदाजीत 5 विकेट्स घेत नवा विक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश (South Africa vs Bangladesh) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मुल्डरने ही कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचे फलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. हा सामना तिसऱ्याच दिवशी संपला. मुल्डरने सामन्यातील तिसऱ्या डावात म्हणजेच बांगलादेशच्या दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेतल्या.

या शानदार कामगिरीसाठी मुल्डरला सामनावीर पुरस्कारही मिळाला. यासह एकाच कसोटी सामन्यात शतक झळकावून 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या निवडक खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे. या यादीत मुल्डर पाचवा खेळाडू ठरला आहे. जॅक कॅलिसने (Jack Callis) ही कामगिरी दोन वेळा केली आहे.

एकाच कसोटी सामन्यात शतक आणि 5 विकेट्स घेणारे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू

जिमी सिंक्लेअर

ऑब्रे फॉकनर

जॅक कॅलिस (2 वेळा)

कॉर्बिन बॉश

vian mulder

वियान मुल्डरने आतापर्यंत 28 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांतील 46 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने 35.12 च्या सरासरीने एकूण 1440 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 4 शतकांचा आणि 1 अर्धशतकाचा समावेश आहे. नाबाद 367 धावा ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. गोलंदाजीत त्याने 48 डावांमध्ये एकूण 48 विकेट्स घेतल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा एक डाव आणि 219 धावांनी एकतर्फी पराभव केला. सर्वप्रथम फलंदाजीसाठी उतरलेला बांगलादेशचा संघ अवघ्या 91 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 7 विकेट्स गमावून 494 धावा केल्या आणि डाव घोषित केला. यामुळे दक्षिण आफ्रिकेला 403 धावांची मोठी आघाडी मिळाली.

दक्षिण आफ्रिकेकडून मार्केस एकरमनने 150 धावांची खेळी केली, तर वियान मुल्डरने 100 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ पुन्हा अडचणीत सापडला. मुल्डरच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा दुसरा डाव 184 धावांवर आटोपला. त्यामुळे, दक्षिण आफ्रिकेने हा सामना एक डाव आणि 219 धावांनी जिंकला.

Comments are closed.