IPL 2027 मधल्या या तीन संघांचे कर्णधार कोण होणार? ‘शिलेदार’ ठरण्यापूर्वीच खेळ रंगला; मुंबईच्या घोषणेकडे लक्ष

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2027 साठी सर्व दहा संघांनी आपली मोर्चेबांधनी केली असून सहा संघांनी आपले कर्णधार जवळपास निश्चित केले असून तीन संघांच्या कर्णधारांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. मिनी ऑक्शनपूर्वी सर्व दहा संघांनी आपली रिटेंशन यादी जाहीर केल्यामुळे खेळाडूंचा तिढा थोडक्यात सुटला आहे. मात्र, चाहत्यांसाठी अजूनही संपूर्ण चित्र स्पष्ट झालेलं नाही. येत्या 16 डिसेंबर रोजी गोव्यात मिनी लिलाव पार पडणार आहे. या लिलाप प्रक्रियेनंतर सर्व दहा संघांचे शिलेदार घोषित केले जाीतल.

दरम्यान, आज 5 वाजून 45 मिनिटांची मुंबई इंडियन्स आपल्या कर्णधाराची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबईचा कर्णधार होणार असल्याची दाट शक्यता आहे. इतर सहा संघांच्या कर्णधारांचा विचार करता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी रजत पाटीदार, चेन्नई सुपर किंग्जसाठी ऋतुराज गायकवाड, गुजरात टाइटन्ससाठी शुभमन गिल, पंजाब किंग्जसाठी श्रेयस अय्यर, राजस्थान रॉयल्ससाठी रियान पराग आणि सनरायझर्स हैदराबादसाठी पॅट कमिन्स यांचे नाव आघाडीवर आहे, तर कमिन्सच्या अनुपस्थितीत इशान किशन पर्याय ठरू शकतो.

दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. ऋषभ पंतच्या पुनरागमनानंतर आणि सौरव गांगुली व युवराज सिंह यांच्यासारख्या नवीन प्रशिक्षकवर्गामुळे दिल्लीचा कर्णधार कोण असेल याकडे लक्ष लागले आहे, तर अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर केकेआरमध्ये रिंकू सिंह दावेदार मानला जातोय आणि पंत गेल्यानंतर लखनऊनेही नवीन कर्णधार जाहीर केलेला नाही.

Comments are closed.