IPL 2027 – आला रे मुंबईचा राजा! हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2027 साठी मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा हिटमॅन रोहित शर्माच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्ताव मुंबई इंडियन्सचा खेळ सुमार राहिला होता. त्यामुळे बरीच टीका मॅनेजमेंटवर झाली होती. या सर्व गोष्टींचा विचार करता आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावाची संघाने अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांना आनंद द्विगुणीत झाला असून कर्णधार म्हणून रोहित शर्माला पुन्हा एकदा मैदानात पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता आता या क्षणापासून शिगेला पोहोचली असावी.

Comments are closed.