‘केबीसी’मध्ये 1 कोटी जिंकलेल्या भूषणचे गावात जंगी स्वागत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जिह्यातील बलवाडी गावच्या भूषण ठाकरे या तरुणाने ‘कौन बनेगा करोडपती’च्या 19 व्या पर्वाचा पहिला करोडपती ठरल्यानंतर भूषण मुंबईतून आपल्या मूळ गावी बलवाडीला परतला. मजुरी करणाऱया कुटुंबातील या मुलाने 1 कोटी रुपये जिंकल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.

भूषण मुंबईतून परत बलवाडीला गेल्यावर गावात त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. त्याच्या स्वागताचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन तो गावी पोहोचल्याचे दिसत आहे. यावेळी त्याला मित्रांनी खांद्यावर उचलून घेत गुलाल उधळून त्याचे स्वागत केले.

सात कोटी हुकले

एक कोटी जिंकल्यानंतरही भूषणकडे फिफ्टी-फिफ्टी ही एक लाइफलाइन शिल्लक होती. मात्र, केबीसीच्या नियमानुसार सात कोटी रुपयांच्या अंतिम प्रश्नासाठी कोणतीही लाइफलाइन वापरण्याची सुविधा नव्हती. भूषणला उत्तर माहीत होते, पण खात्री नव्हती, त्यामुळे त्याने खेळ क्विट करण्याचा निर्णय घेतला.

Comments are closed.