ऑस्ट्रेलियात पर्यटकांना टुरिस्ट व्हिसा वाढवण्यास बंदी; नवे नियम लागू, चार लाख हिंदुस्थानींना फटका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ऑस्ट्रेलियाने शनिवारपासून आपल्या पर्यटक व्हिसासाठी नवे नियम जारी केले आहेत. नव्या नियमानुसार, आता पर्यटक व्हिसावर जाणारे लोक ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर आपल्या व्हिसाची मुदत वाढवू शकणार नाहीत.

सध्या ऑस्ट्रेलियात जास्तीत जास्त 12 महिन्यांचा पर्यटक व्हिसा दिला जातो, मात्र किती दिवस पर्यटकांना थांबवण्याची परवानगी दिली जाईल, हे व्हिसा जारी करणारे अधिकारी ठरवतात. ऑस्ट्रेलियात जाणाऱया हिंदुस्थानी पर्यटकांकडे आता परतीचे तिकीट असणे आवश्यक आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने आणलेल्या नव्या नियमाचा चार लाख हिंदुस्थानींना फटका बसणार आहे. 2025 मध्ये 4.51 लाख हिंदुस्थानी ऑस्ट्रेलियात पोहोचले होते.

ऑस्ट्रेलियातील शुल्क

बाहेरील अर्जदार             – 15,400 रुपये

ऑस्ट्रेलियातून अर्ज        – 38,700 रुपये

वार्ंकग हॉलिडे अर्ज        – 51,600 रुपये

विद्यार्थी व्हिसा – 1,53,500 रुपये

पदवीधर व्हिसा – 3,53,500 रुपये

कामासाठी व्हिसा           – 2,48,187 रुपये

Comments are closed.