मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली एक्झिटजवळील घटना, ब्रेक फेल टेम्पोची स्कूल बसला धडक; सुदैवाने ४० विद्यार्थी बालबाल बचावले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

काळ आला होता पण वेळ नाही… याचा प्रत्यय आज दुपारी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर आला. महामार्गावरील एक्झिटजवळील तीव्र उतारावर टेम्पोचा ब्रेक फेल झाला आणि हा भरधाव टेम्पो लोणावळ्याहून अलिबागला सहलीला जाणाऱ्या स्कूल बसवर जाऊन धडकला. हा अपघात इतका भीषण होता की यात टेम्पोचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेनंतर ४० विद्यार्थी बालबाल बचावले.

मुंबई-पुणे जुन्या अलिबागमधील जे.एस.एम. विद्यालयाचे ४० विद्यार्थी खासगी बसने सहलीला निघाले होते. अलिबागहून ते लोणावळ्याला गेले. त्यानंतर पुन्हा अलिबागच्या दिशेने जात असता खोपोली एक्झिटजवळील तीव्र उतारावर भरधाव टेम्पोने स्कूल बसला जोरदार धडक दिली. अचानक झालेल्या अपघातामुळे विद्यार्थी हादरून गेले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा वाहतूक शाखेचे अधिकारी राजेंद्र आरोळे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर हेल्प फाऊंडेशनच्या तातडीच्या मदतीमुळे दिलासा

वाहतूक शाखेचे अधिकारी, हेल्प फाऊंडेशनचे सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. त्यांच्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

सदस्यांनी आणि स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी पुढाकार घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना केल्या. दुसरी बस बोलावून विद्यार्थ्यांना पुढे मार्गक्रमण करण्यात आले. तर या अपघातात बस व टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.

Comments are closed.