परभणीत सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण तापणार; राहुल गांधी सांत्वनासाठी जाणार, शिवसेना, भाजपचे मंत्रीही
परभणी : राज्यात परभणी हिंसाचार प्रकरण, नंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यूनंतर राज्यभरात त्याचे गंभीर पडसाद उमटले आहेत. सोमनाथ सुर्यवंशीच्या पोस्टमॉर्टम प्रकरणी धक्कादायक अहवाल समोर आल्याने संपूर्ण राज्य हादरले होते. विधीमंडळात यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचे पहायला मिळाल्यानंतर आज पुन्हा परभणीत सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण तापणार आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी परभणीत सोमनाथच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यास येणार असून शिवसेना आणि भाजपचे मंत्रीही परभणीत येणार आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला नक्की काय वळण लागतंय याकडे सर्वाचे लक्ष आहे.
परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना करण्यात आल्यानंतर परभणी बंदच आयोजन करण्यात आलं होतं. या बंदमध्ये काही समाजकंटकांनी हिंसक आंदोलन केलं आणि यानंतर पोलिसांनी धरपकड सुरू केली. ज्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरुण वकिलाचा मृत्यू झाला. यानंतर सोमनाथच्या अंत्यविधी झाल्यानंतर घरी जात असताना आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांचाही ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.परभणीतील वातावरण या दोन घटनांमुळे चांगलेच तापले होते, याचे विधिमंडळातही पडसाद पाहायला मिळाले.
परभणी शहरातील संवेदनशील घटनांमुळे तापलेल्या वातावरणात आज काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी परभणीत दाखल होणार आहेत. त्यांचा दौरा न्यायालयीन कोठडीत मयत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी असून, त्यानंतर आंबेडकरी चळवळीतील दिवंगत नेते विजय वाकोडे यांच्या घरी ते सांत्वन करणार आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना झाल्यानंतर परभणीत बंद पुकारण्यात आला होता. या बंददरम्यान काही समाजकंटकांनी हिंसक आंदोलन केले, ज्यामुळे पोलिसांनी धरपकड केली. या कारवाईत 35 वर्षीय तरुण वकील सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक झाली होती. न्यायालयीन कोठडीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
राहुल गांधी आज शहरात, सांत्वनासाठी जाणार
सोमनाथ यांच्या अंत्यविधीनंतर घरी जात असताना आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे परभणीतील वातावरण चांगलेच तापले होते आणि विधिमंडळात याचे तीव्र पडसाद उमटले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात उत्तर देताना, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची तर विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर केली. तसेच एका पोलीस निरीक्षकाला निलंबित करून प्रकरणाची न्यायालयीन चौकशी लावली.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या कुटुंबांना भेट देऊन सांत्वन केले.
आज दुपारी 2 वाजता राहुल गांधी परभणीत दाखल होतील. प्रथम ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना भेटून परिस्थिती समजून घेणार आहेत. त्यानंतर विजय वाकोडे यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करतील.तत्पूर्वी, शिवसेना गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनीही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होणार असल्याचे सांगितले. सायंकाळी भाजप नेत्या आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या दोन्ही कुटुंबांना भेट देणार आहेत.
अधिक पाहा..
Comments are closed.