छगन भुजबळांचा हल्लाबोल सुरुच, अजितदादा पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, काहींना थांबा सांगितलं तर…

अजित पवार छगन भुजबळांवर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळातून डावल्यानंतर ते दररोज उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवत आहेत. छगन भुजबळांकडून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हल्लाबोल सुरु आहे. आता अजित पवारांनी पहिल्यांदाच अप्रत्यक्षपणे छगन भुजबळांवर भाष्य केलं आहे.

काही लोकांना मंत्रिमंडळात थांबायला सांगितल्यावर त्यांनी रोष व्यक्त केल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. मात्र राज्यात कोणावरही अन्याय होणार नसल्याचंही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलंय. मंत्री जास्त आहेत. पूर्वी 28 मंत्री आणि बाकी राज्य असायचे पण आता तसे नाही. त्यामुळे काहींना एकच खाते आले आहे, असंही अजित पवारांनी सांगितले. आपण विचारावर ठाम आहोत. आपण भाजप सोबत असलो तरी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने काम करू, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार रविवारी बारामतीमध्ये बोलत होते.

छगन भुजबळांच्या मनात नेमकं चाललंय काय?

दरम्यान यानंतर भुजबळांनी देखील अजित पवारांना अप्रत्यक्षरित्या लक्ष केलं. सुरूवातीला राज्यसभेवर पाठवलं नाही, आता आमदारकीचा राजीनामा देऊन राज्यसभेवर जायला सांगितल्याचं छगन भुजबळांनी म्हणाले. दरम्यान छगन भुजबळांनी अजित पवारांवर वयावरुन टीकास्त्र डागलं. तर शरद पवारांचं देखील कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे छगन भुजबळांच्या मनात नेमकं चाललंय काय?, असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.

छगन भुजबळ काय म्हणाले?

मुंबईमध्ये रविवारी (22 डिसेंबर) ओबीसी बहुजन आघाडीची बैठक झाली. या बैठकीत छगन भुजबळांना पाठिंबा देण्याचा निर्धार ओबीसी नेत्यांनी केला. या बैठकीनंतर छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. नवीन लोकांना संधी द्यायला हवी, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. यावर देखील छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. चांगली गोष्ट आहे, पण हे ठरवलं पाहिजे किती वर्ष तरुण म्हणायचे, की 67-68 पर्यंत तरुण म्हणायचं?, मी अगोदरच म्हणालो होतो, मला लोकसभेत पाठवा तिथं थांबावं लागलं, राज्यसभेत थांबावं लागलं, तेव्हा म्हणाले राज्यात गरज आहे. आता म्हणतात राज्यसभेत जा…म्हणजे मी विधासभेत राजीनामा द्यावा, हे कसं शक्य आहे?, असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला. तसेच अजित पवारांकडून तुमची फसवणूक झाली का?, या प्रश्नावर मला माहित नाही, तुम्हाला काय निष्कर्ष काय काढायचा तो काढा, असं छगन भुजबळांनी सांगितले.

संबंधित बातमी:

खातेवाटप जाहीर होताच धनंजय मुंडेंची पोस्ट; फडणवीस, शिंदे, अजितदादांचं नाव घेत म्हणाले, जनतेशी थेट…

अधिक पाहा..

Comments are closed.