अमित शाह, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंचे आयडॉल, म्हणून… संजय राऊतांची टीका

संजय राऊत मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray)आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीवर अनेक चर्चा सुरू आहेत. ही चर्चा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये देखील आहे. कारण मी राज ठाकरे यांच्यासोबत जवळून काम केले आहे.  त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबाशी माझं जवळचं नातं राहिले आहे. माझ्या पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे हेही माझ्या  अतिशय जवळचे आणि मोठ्या भावाप्रमाणे आहेत. दरम्यान काल दोघे भाऊ एकत्र आले त्याचा निश्चित महाराष्ट्राला आनंद झाला आहे. ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राच्या जनतेचे प्रेम आहे.

जनतेचे दोन्ही भावंडांवर जीवापाड प्रेम आहे. त्याच दृष्टीने मराठी माणूस त्यांच्याकडे बघत असतो. दोघांचे पक्ष वेगळे आहेत. त्यांच्यात वैचारिक मतभेद आहेत. कुटुंब म्हणुन मात्र आम्ही कायम एक आहोत. मात्र राज ठाकरे यांचे अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे ऑइडॉल आहेत. आमच्या पक्षाचे तसें नाही.  महाराष्ट्रावर अन्याय करणारे, आमचा पक्ष फोडणारे हे लोक आहेत. त्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकतं नसल्याचे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर भाष्य केलंय.

दोन भाऊ काल एकत्र आले त्याचा नक्कीच आनंद, मात्र….

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे मुंबईत काल (22डिसेंबर) एकत्र आल्याचं पाहायला मिळाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भाच्याचं लग्न होतं. या लग्न सोहळ्यानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण कुटुंब एकत्र पाहायला मिळाले. यावेळी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, रश्मी ठाकरे देखील उपस्थित होते. मुंबईतील दादरमधील राजे शिवाजी विद्यालयात लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी लग्नाला राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहिले. लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळाले. तसेच दोघांमध्ये काही संवाद देखील झाला.

राज ठाकरे दुर्दैवाने अशा लोकांची साथ देतात

नुकतीच राज ठाकरेंनी रश्मी ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नाला हजेरी लावली होती. दरम्यान या भेटीवरुन राज्याच्या राजकारणात अनेक प्रतिक्रिया उमटतांना बघायला मिळाल्या आहेत. राज ठाकरे आमच्यासाठी वेगळे नाहीत. मात्र मोदी, शाह हे महाराष्ट्राचे शत्रु आहेत. राज ठाकरे दुर्दैवाने अशा लोकांची साथ देतात. त्यामुळे आमचे मतभेद. मात्र कुटुंब एकच असतं. अजित पवार शरद पवार एकत्र येऊन भेटतात. रोहित पवारही काकांना येऊन भेटतात. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेट ही एक कौटुंबीक भेट असल्याची प्रतिक्रिया ही खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

अधिक पाहा..

Comments are closed.