डंपर चालकाने धडक दिल्यानंतरचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर; पोट भरण्यासाठी आलेल्या कामगारांनी आपल्

पुणे: पुणे शहरातील वाघोली केसनंद परिसरामध्ये काल (रविवारी) रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या 9 जणांना डंपरने चिरडलं. पुण्यात काम शोधण्यासाठी आलेल्या या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने 9 जणांना चिरडले. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर मृतांमध्ये एक आणि दोन वर्षांच्या चिमुकल्यांचा समावेश आहे. या ठिकाणी जवळपास 40 जण झोपले होते, या दुर्दैवी घटनेने शहर हादरलं आहे, दरम्यान ही थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

डंपर चालकाने धडक दिल्यानंतर चिमुरड्यांना चिरडून घेऊन जातानाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. रविवारी मध्यरात्री एक वाजता केसनंद फाट्याजवळ मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डंपर चालकाने नऊ जणांना चिरडलं. अपघात घडतात परिसरात एकच खळबळ उडाली. हातावर पोट असलेल्या कामगारांनी नातेवाईकांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा अपघातात मृत्यू झाला. डंपर चालकाने सख्खे बहीण-भाऊ असलेल्या अवघ्या एक आणि दोन वर्षाच्या चिमूरड्यांवर डंपर घातला, त्याचबरोबर या घटनेत एका 22 वर्षांच्या तरूणाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

पुणे पोलिसांनी दिली माहिती

पुण्यातील वाघोली केसनंद परिसरामध्ये घडलेल्या अपघाताबाबत पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी माहिती देताना सांगितलं की, ही अतिशय गंभीर घटना आहे. डंपर चालकाला अटक करण्यात आली आहे. तो अपघातावेळी मद्यधुंद अवस्थेत आहे की नाही हे तपासण्यासाठी मेडिकल टेस्ट सुरु आहे. ड्रायव्हर 26 वर्षाचा आहे. हलगर्जीपणा दिसला तर कारवाई करण्यात येणार आहे. वर्षभरात 72 अपघात जड वाहनामुळे झाले आहेत. बंगलोर बायपासजवळ जास्त अपघात झाले आहेत. रात्रीच्यावेळी डंपर आणि जड वाहनांचे अपघात होतात. पुण्याच्या बाहेरील भागात हे अपघात होतात. निवारा मिळाला नाही म्हणून ते फूटपाथवर झोपले. यात कामगारांची चूक नाही. कारण अपघात फुटपाथवर झाला आहे. डंपरवर काही प्रमाणात बंधन आहेत. या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करत आहेत. मृत व्यक्ती अमरावतीचे आहेत. कामासाठी पुण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मृत झालेल्यांची नावं

1. विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा
2. वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष
3. वैभव रितेश पवार वय 2 वर्ष

जखमी झालेल्यांची नावं

1. जानकी दिनेश पवार, 21 वर्षे
2. रिनिशा विनोद पवार 18
3. रोशन शशादू भोसले, 9 वर्षे
4. नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे
5. दर्शन संजय वैराळ, वय 18
6. आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे

अधिक पाहा..

Comments are closed.