Devajit Saikia : देवजित सैकिया यांची BCCI च्या सचिवपदी निवड!

मुंबई : क्रिकेट जगतातून मोठी घडामोड समोर आली आहे. माजी क्रिकेटपटू देवजित सैकिया यांची बीसीसीआयच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी हा पदभार जय शाह यांच्याकडे होता. ते मूळचे आसामचे असून याआधी त्यांनी भारतीय संघाकडून क्रिकेट खेळलेले आहे.

विशेष बैठकीत झाली निवड

बीसीसीआयच्या सचिवपदाची जबाबदारी आता देवजित सैकिया यांच्याकडे आली आहे. जय शाह यांची ते जागा घेतील. बीसीसीआयने नुकतेच विशेष बैठक बोलावली होती या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सैकिया यांच्या सचिवपदाच्या निवडीसह प्रभतेज सिंह भाटीया यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

अगोदर अंतरिम सचिवपदाची जबाबदारी सांभाळली

जय शाह यांची 1 डिसेंबर रोजी आयसीसीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी बीसीसीआयचे सचिवपद सोडले होते. त्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी  आपले अधिकार वापरून सैकिया यांच्याकडे बीसीसीआयच्या अंतरिम सचिवपदीपदाचा कारभार सोपवला होता. आता मात्र त्यांची अधिकृतपणे बीसीसीआयच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Bangladesh Squad Champions Trophy : बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम

Ira Jadhav Triple Century Record : 42 चौकार, 16 षटकार अन् 346 धावा… 14 वर्षाच्या इरा जाधवचा धमाका! आजपर्यंत कोणालाच जमलं नाही ते करून दाखवलं

Virat Kohli and Rohit Sharma : सीनियर खेळाडूंच्या मनमानीला बसणार चाप! BCCIचा महत्त्वाचा निर्णय; रोहित-विराटला मोठा धक्का

अधिक पाहा..

Comments are closed.