एसआयटीचा प्रमुख अन् दोन बड्या वकिलांची नावं सांगितली, मस्साजोगच्या गावकऱ्यांच्या 5 मागण्या, संक

बीड: संतोष देशमुख यांच्या हत्येतील एक फरार आरोपी पकडण्यापासून वाल्मीक कराड याच्यावर हत्या आणि मोका या अंतर्गत गुन्हा दाखल करावा. तसेच तपासा संदर्भात माहिती दिली जात नसून या प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करावी. ॲड. उज्वल निकम किंवा ॲड. सतीश मानिंदे  यांनी हा खटला न्यायालयात लढवावा. जर ही मागणी मान्य होत नसेल तर 14 जानेवारी या मकर संक्रांतीच्या दिवशी मस्साजोग मधील नागरिक आणि संतोष देशमुख यांची पत्नी, मुलगी, भाऊ व भावजय यांच्यासह सामूहिक आत्महत्या करणार असल्याचे निवेदन त्यांनी तहसीलदार यांना दिले आहे.  या बाबत महादेव मंदिरात बैठक संपन्न झाली.

12 जानेवारी रोजी मस्साजोग येथील नागरिकांनी हनुमान मंदीरात एक बैठक घेवून निर्णय घेत तहसीलदार यांना एक निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, 9 डिसेंबर रोजी कै. संतोष पंडीतराव देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे. या घटनेला 34 दिवस झालेले आहेत. तरीही अद्याप एक आरोपी अटक झालेला नाही. तसेच वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा जाणीव पूर्वक नोंद केलेला नसुन; त्याच्यावर मकोका लावण्यात आलेला नाही. तसेच सीआयडीचा तपास कुठ पर्यंत आलेला आहे. याची माहीती कुटुंबीयांना दिली जात नाही. तसेच सरकारी वकील म्हणून ॲड. उज्वल निकम किंवा ॲड. सतीश मानेशिंदे यांची अद्याप नेमणुक झालेली नाही. एसआयटी समीती मध्ये अ‌द्याप अमरावतीचे अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला जर जामीन भेटला तर त्याच्या हातुन हाल-हाल होऊन मरण्यापेक्षा आम्ही कै. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय व सर्व गावकरी हे  14 जानेवारी रोजी महादेव मंदीर या ठिकाणी अंगावर पेट्रोल ओतुन जाळुन घेऊन सामुहीक आत्मदहन करणार आहेत, असे संबंधित निवेदनात म्हटले आहे.

वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला मोक्का लावण्याची मागणी

मस्साजोगच्या गावकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले आहे. यामध्ये पाच प्रमुख मागण्यात करण्यात आल्या आहेत. फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करण्यात यावी. शासनाचे वकील म्हणून ॲड. उज्वल निकम किंवा ॲड. सतीष मानेशिंदे यांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी. एसआयटी मध्ये अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत या अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी. या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याची माहीती घरच्यांना देण्यात यावी. पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून सह आरोपी करण्यात यावे. तसेच वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला मोक्का लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

वाल्मिक कराडवर हत्याप्रकरणी कारवाई का नाही ? धनंजय देशमुखांचा सवाल

पोलिसांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराड वगळता उर्वरित आरोपींवर मोक्का कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, यावरुन वाद निर्माण झाला आहे. संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हे सोमवारी आंदोलन करणार आहेत. वाल्मिक कराड यांच्यावर अद्याप मोका अंतर्गत कारवाई झाली नाही त्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. अद्याप वाल्मिक कराडवर हत्याप्रकरणी कारवाई का नाही ? असा सवाल धनंजय देशमुख यांनी सरकारला केला आहे. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा ‘चाप’ ओढला

अधिक पाहा..

Comments are closed.