केंद्र सरकारच्या योजनांचे अनुदान मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनाही मिळालं नाही : कृषीमंत्री
माणिकराव कोकाटे, नाशिक : “केंद्र सरकारच्या अनेक योजनांचे अनुदान आहेत पण ते मिळत नाहीत. केंद्राकडून अनुदान न आल्याने शेतकऱ्यांना देऊ शकलो नाही. अजितदादांनी (Ajit Pawar) काही तरतूद केली तर पुढील आठवड्यात देणार आहे. पर्वा अजित पवार यांच्यासोबत बैठक असणार आहे”, असं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केलंय. ते नाशिकमध्ये बोलत होते.
शेतकऱ्यांसाठी अजित पोर्टल सुरू करणार, आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून काम सुरु
माणिकराव कोकाटे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी अजित पोर्टल सुरू करणार आहे. शेती विभागात सुरळीतपणा आणि पारदर्शकपणा आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आयआयटीचे विद्यार्थी अजित पोर्टल तयार करत आहेत, लवकरच ते लॉन्च करणार आहोत. केंद्र सरकारच्या अनेक योजनांचे अनुदान आहेत,पण ते मिळत नाही. केंद्राकडून अनुदान न आल्याने शेतकऱ्यांना देऊ शकलो नाही.अजितदादांनी काही तरतूद केली तर पुढील आठवड्यात देणार आहोत.
आम्ही कालही अजितदादांसोबत होतो, उद्याही त्यांच्यासोबत राहणार
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, नंदुरबारला मी याआधी कधीच गेलो नाही, समस्या काय आहे माहिती नाही पालकमंत्री पद मिळाल्याने समस्या समजून घेऊन सोडवेन. आदिवासींच्या हिताचे निर्णय घेणार आहोत. पहाटेचा शपथविधी बाबत धनंजय मुंडे यांना महिती होते,मला तेव्हा कल्पना नव्हती. अजितदादांनी मला तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगितले होते,शपथ विधी आहे हे मला माहिती नव्हते. दिलीप बनकर आणि आम्ही दोघे तिघे होते तेव्हा समोर शपथविधी होता. अजितदादांनी जो निर्णय घेतला आम्हाला मान्य आहे,आम्ही तेव्हाही दादा बरोबर होतो आजही आहे आणि उद्या ही राहणार आहोत.
भुजबळांनी पक्ष नेतृत्वावर टीका टिपणी करू नये – माणिकराव कोकाटे
भुजबळांच्या बाबतीत वरीष्ठ पातळीवर निर्णय होतील. मी भाष्य करायचे बंद केले. भुजबळांनी पक्ष नेतृत्वावर टीका टिपणी करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे. दोन दिवसीय अधिवेशनातून कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळाले आहे. 2 दिवसांत 30 ते 32 लोकांनी विचार मांडले त्याची नोंद केली आहे, त्यामुळे पक्ष एक नंबरचा होण्यास वेळ लागणार नाही, असंही माणिकराव कोकाटे यांनी नमूद केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.