आठवड्यात 72 तास काम करा म्हणणाऱ्या नारायण मूर्तींच्या इन्फोसिसमध्ये कर्मचाऱ्यांना पगारवाढ

मुंबई : देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसने त्याच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून यंदा कर्मचाऱ्यांना 6 ते 8 टक्क्यांची वाढ देण्यात येणार आहे. ही वेतनवाढ जानेवारी आणि एप्रिल अशा दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. या आधी नोव्हेंबर 2023 मध्ये कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी इन्फोसिसच्या नारायण मूर्तींनी कर्मचाऱ्यांना आठवड्यात 72 तास काम करण्याचा सल्ला दिला होता.

इन्फोसिस कंपनीने यंदाच्या आर्थिक वर्षाच्या तिमाहित चांगली महसूल वाढ नोंदवली होती. कंपनीने या काळात 11 टक्क्यांची वाढ नोंदवली असून 6,806 कोटी रुपयांचा घसघशीत महसूल कमवला आहे. त्या आधीच्या आर्थिक वर्षाच्यात तिमाहित हा फायदा 6,106 कोटी रुपये इतका होता.

1 जानेवारीपासून वेतनात वाढ

इन्फोसिसने जाहीर केलेली वेतनवाढ ही दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. 1 जानेवारीपासून जॉब लेव्हल 5 च्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लागू करण्यात येणार असून ती फेब्रुवारीमध्ये मिळणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात जॉब लेव्हल 6 च्या कर्मचाऱ्यांना, मार्चपासून वेतनवाढ लागू करण्यात येणर असून ती एप्रिलमध्ये मिळणार आहे.

जॉब लेव्हल 5 मध्ये इंजिनिअर, सिनिअर इंजिनिअर, सिस्टिम इंजिनिअर, कन्सलटंट यांचा समावेश होतो. तर जॉब लेव्हल 6 मध्ये मॅनेंजर, सिनिअर मॅनेंजर, डिलिव्हरी मॅनेंजर आणि सिनिअर डिलिव्हरी मॅनेंजर यांचा समावेश होतो.

भारतीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत परदेशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांन कमी प्रमाणात वेतन वाढ होणार आहे. पण चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला चांगले वेतन वाढ होणार असल्याची माहिती इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी जयेश संघराजका यांनी सांगितलं.

इन्फोसिस Q3 FY25 रिझल्ट

देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसने डिसेंबर तिमाहीत 41,764 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला, तर कंपनीचा PAT या कालावधीत 6,806 कोटी रुपये इतका होता. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा YoY आधारावर 11% ने वाढून Rs 6,806 कोटी झाला आहे. तर ऑपरेशन्समधील महसूल 7.6% ने वाढून Rs 41,764 कोटी झाला आहे.

देशातील आघाडीच्या IT कंपनीने चालू आर्थिक वर्षासाठी आपले रेव्हेन्यू गायडेंडमध्ये बदल करून ते 4.5% ते 5% केले आहे. कंपनीचा एकत्रित EBIT Q3  3% ने वाढून 8912 कोटी रुपये इतका झाला आहे. त्याच वेळी, डिसेंबर तिमाहीत कंपनीचे EBIT मार्जिन QoQ आधारावर 21.1% वरून 21.3% पर्यंत वाढलं आहे.

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..

Comments are closed.