भ्रष्टाचार होतो हे मंत्र्यांनीच कबूल केलं, हार्वेस्टरमागे सरकारनं 8 लाख मागितले, सुळेंचा निशाणा

सुप्रिया सुळे : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी 400 कोटी रुपयांचा पीक विमा घोटाळा झाल्याचे वक्तव्य केले आहे. तर सुरेश धस यांनी 5000 कोटींचा पीक विमा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळं हे सरकारच घोटाळा झाल्याचे मान्य करत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. कोकाटे म्हणाले की, केंद्र सरकार महाराष्ट्राला निधी देत नाही तसेच 3 ते 5 टक्के भ्रष्टाचार होतोच असे सुळे म्हणाल्या. सरकारने हार्वेस्टरमागे 8 लाख रुपये मागितले हे गंभीर असल्याचे सुळे म्हणाल्या. भ्रष्टाचार होतो हे मंत्रीच कबूल करत आहेत. हे मी पार्लमेंट सेशनमध्ये मांडणार असल्याचं सुळे यांनी सांगितलं.

राज्यात कायदा सुव्यवस्था काही राहीली नाही

राज्यात कायदा सुव्यवस्था काही राहीली नाही. सरकारला दोन महिने झाले. ते 100 दिवसांचा प्रोग्राम देणार होते, आज 60 दिवस झाले आहेत, असे सुळे म्हणाल्या. इंदापूरवर अन्याय झाला आहे. पालकमंत्रीपद दिले नाही. मी सरकारला बोलणार आहे, असे म्हणत सुळे यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांना टोला लगावला. सरकार स्थापन होऊन 60 दिवस झाले तरी कोणतेच काम झाले नाही, अेही सुळे म्हणाल्या.

निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्न

निधी नसल्यामुळं निरा भीमा नदी जोड प्रकल्प ठप्प आहे. निधी का मिळत नाही? असा सवाल सुळे यांनी केला. निधी नसल्यामुळं शेतकऱ्यांचा डीपी बसवला जात नाही, असेही सुळे म्हणाल्या. विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवाला अनेक कारणं असल्याचे सुळे म्हणाल्या. उत्तम जानकर निवडून आले तरी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळं मला निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्न पडला असल्याचे सुळे म्हणाल्या. लोक बॅलेटवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहेत. समाजात अस्वस्थता असेल तर लोकांच्या मागणीप्रमाणे बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात असेही सुळे म्हणाल्या.

सरकार खुनी लोकांना का लपवत आहे?

सुप्रिया सुळे जितेंद्र पवार रोहित पवार संदीप क्षीरसागर सोळंकी सुरेश धरण बजरंग सोनवणे अंजली दमानिया नमिता मुंडदा हे 9 लोक आणि काँग्रेसचे लोक सातत्याने वाल्मीकरांना 302 मध्ये आरोपी करा हा मुद्दा मांडत आहेत असे सुळे म्हणाल्या. राज्यातील 6 पक्ष सातत्याने मागणी करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर दिले पाहिजे. सरकार का खुनी लोकांना लपवत आहे असे सुळे म्हणाल्या.

राज्यात प्रचंड अस्वस्थ करणारी परिस्थिती

बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे यांच्या एनकाउंटरवरून न्यायालयाने पोलिसांना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे, यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज-काल जेल ऑफ चॉईस ही नवीन स्कीम सरकारने काढली आहे. प्रचंड अस्वस्थ करणारी परिस्थिती राज्यात आहे. एवढा मोठा जनाधार या सरकारला मिळाला आहे. सातत्याने सर्वसामान्य माणसांना फसवल्याचा फील का येतोय असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

अधिक पाहा..

Comments are closed.