Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा थाटच न्यारा! ‘तो’ सोन्याचा मुकुट अमरावती भाजपकडे केला सु
अमरावती : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) भाजप (BJP), शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Faction) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar Faction) महायुतीने (Mahayuti) दमदार विजय मिळवत 235 जागा पटकावल्या. तर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वाट्याला अवघ्या 49 जागा आल्या. यात भाजप 132 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला. हा ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील (Pravin Pote Patil) यांनी सोनेरी मुकुट देऊन स्वागत केले होते. आता हा सोनेरी मुकुट चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती (Amravati News) भाजपला सुपूर्द केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीचे पालकमंत्री (Amravati Guardian Minister) झाल्यानंतर त्यांचे शुक्रवारी पहिल्यांदाच अमरावतीत आगमन झाले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्याचा गौरव आणि सन्मान करण्यासाठी भाजप अमरावती शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण पोटे पाटील यांनी सुवर्ण मुकुट चढवत त्यांचा भव्य सत्कार केला. फटाक्यांची आतीषबाजी, फुलांची उधळण करत क्रेनद्वारे हार टाकून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे यावेळी जंगी स्वागत करण्यात आले.
‘तो’ सोनेरी मुकुट अमरावती भाजपला केला सुपूर्द
दरम्यान, भाजपला मिळालेला विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निष्ठापूर्वक परिश्रमातून मिळाला असल्याने आपण हा सोनेरी मुकुट भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना भेट म्हणून देत आहोत, असे स्पष्ट करून चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुकुट शहर भाजपाच्या स्वाधीन केला. हा मुकुट किती रुपयांचा आहे याची मला कल्पना नसून या मुकुटातून येणाऱ्या आर्थिक रक्कमेतून समाजोपयोगी उपक्रमात ही रक्कम खर्च करावी, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती भाजपाच्या कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्पष्ट केले.
बावनकुळेंच्या कृतीची जोरदार चर्चा
भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचा केलेला हा गौरव सामान्य कार्यकर्त्यांना सुखावून गेला आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून एक आगळावेगळा आदर्श सर्व कार्यकर्त्यांच्या समक्ष प्रस्तुत केला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या कृतीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.