विराट, रोहित ढेपाळले; पुजारा, रहाणेने लक्ष वेधले, आकडेवारी पाहून तुम्ही व्हाल अचंबित, BCCI किती
रणजी ट्रॉफी 2025: रणजी ट्रॉफी हंगामात विराट कोहली, रोहित शर्मा पुनरागमनात अपयशी ठरला असला तरी, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी मैदान गाजवले. चेतेश्वरने 99, तर अजिंक्य रहाणने 96 धावांची खेळी केली. त्यामुळे दोघांचाही पुन्हा एकदा भारताच्या कसोटी संघासाठी विचार व्हावा, अशी मागणी चाहत्यांनी सोशल मीडियावर केली. पण दोघांनाही कोणतेही कारण न देता टीम इंडियामधून बाहेर केले होते. पण रणजी ट्रॉफीमध्ये या दोन्ही खेळाडूंनी बॅटने कहर करून पुन्हा एकदा बीसीसीआयला आरसा दाखवला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजारा-रहाणेच्या अनुपस्थितीचे परिणाम टीम इंडियाला आधीच भोगावे लागले आहेत. एकेकाळी टीम इंडियाचा कणा म्हणून ओळखले जाणारे हे दोन्ही खेळाडू जवळजवळ एक वर्षापासून टीम इंडियाचा भाग नाहीत. पण त्याच्या बॅटची ताकद आजही तितकीच दिसते.
विशेष म्हणजे अलिकडेच जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या रणजी ट्रॉफीमध्ये रोहित शर्माला पहिल्या डावात फक्त 3 धावा करता आल्या. दुसऱ्या डावात 28 धावा करून तो बाद झाला. याचा अर्थ असा की एक गोष्ट स्पष्ट आहे की जिथे रोहित आणि कोहली अपयशी ठरले, तिथे टीम इंडियाच्या बाहेर असलेले चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी चमत्कार केले.
चेतेश्वर पुजारा 99 धावांवर आऊट
सौराष्ट्र आणि आसाम यांच्यातील रणजी सामना 30 जानेवारीपासून राजकोटमध्ये सुरू झाला. या सामन्यात शुक्रवारी टीम इंडियाचा स्टार कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा 99 धावांवर बाद झाला. पुजाराने गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यात भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तेव्हापासून त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळालेले नाही.
रहाणेचे शतक हुकले…
मेघालय आणि मुंबई यांच्यातील रणजी सामना वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे सुरू आहे. या सामन्यात मेघालय संघ 86 धावांवर गारद झाला. यानंतर, मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने या सामन्यात शानदार खेळी केली आणि शुक्रवारी तो 96 धावा करून बाद झाला. टीम इंडियाच्या कसोटी संघाचे नेतृत्व करणाऱ्या रहाणेने 177 चेंडूंच्या आपल्या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार मारला. रहाणे बऱ्याच काळापासून टीम इंडियाबाहेर आहे. रहाणेने जुलै 2023 मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला.
या रणजी हंगामात रहाणे-पुजाराची कामगिरी
अजिंक्य रहाणेने या रणजी हंगामात (2024-25) 7 सामन्यांपैकी 10 डावात आतापर्यंत 298 धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी 33.11 आहे. तर चेतेश्वर पुजाराने 6 रणजी सामन्यांमध्ये 46.75 च्या सरासरीने 374 धावा केल्या आहेत.
बीसीसीआय किती दिवस करणार दुर्लक्ष?
पुजारा आणि रहाणे हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत धावा काढताना दिसतात, त्यामुळे बीसीसीआय त्यांना किती काळ दुर्लक्षित करेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यांच्या कामगिरीकडे पाहता, दोन्ही दिग्गजांना टीम इंडियामध्ये आणखी एक संधी मिळू शकते. त्याच वेळी, रोहित, विराट, जैस्वाल सारखे अनुभवी खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये अपयशी ठरले आहेत.
हे ही वाचा –
अधिक पाहा..
Comments are closed.