बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म

Radhakrishna Vikhe Patil on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेल्या मनसेच्या मेळाव्यात बोलताना विधानसभेच्या निवडणूक निकालावर संशय व्यक्त केला होता. एवढेच नव्हे तर बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर देखील संशय व्यक्त केला होता. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  (Radhakrishna Vikhe Patil) यांनी राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील मनसेच्या मेळाव्यात बोलताना विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका उपस्थित केली. यावेळी राज ठाकरे यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा मोठा संपर्क आणि काम आहे. गेल्या सात निवडणुकांमध्ये ते मोठ्या मताधिक्याने विजयी होत आले आहेत. साधारण 70 ते 80 हजारांच्या मतांनी निवडून येणारे बाळासाहेब थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे झाले? लोकांनी मतदान केले, पण केलेले मतदान कुठे तरी गायब झाले, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. यावरुन राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, एखाद्या व्यवस्थेवर संशय व्यक्त करणे म्हणजे, त्या भागातील मतदारांचा अपमान करण्यासारखे आहे. हे त्या मतदारसंघातील जनता सहन करणार नाही, असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

विखे पाटलांचा थोरातांना टोला

दरम्यान, अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यात आणखी अप्पर तहसील कार्यालयाला मान्यता देण्यात आली आहे. मात्र याबद्दल बोलताना राधाकृष्ण विखेंनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला आहे. तालुक्याच्या स्वातंत्र्याबद्दल बोलणाऱ्यांचे कुठलेही स्वातंत्र्य हिरावून घेत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तहसील कार्यालय झाल्यानंतर तालुक्याचे विभाग होतील, असा समज निर्माण केला जातोय. मात्र, असं काही होणार नाही. कुठलीही स्वातंत्र्याची लढाई कोणाला लढण्याची आवश्यकता नाही. विधानसभा निवडणुकीनंतर सध्या लोक पारतंत्र्यातून स्वातंत्र्याचा अनुभव घेत असल्याचा देखील टोला विखे यांनी लगावला आहे.

अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील 300 तलाव गाळमुक्त, 300 शाळा सौरउर्जेवर करणे, 300 कन्या विद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून शाळा संरक्षित करणे, 300 रस्ते अतिक्रमण मुक्त करणे असे विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण पाटील यांनी म्हटले आहे. सोबतच अहिल्यादेवी होळकर यांच्या 400 कोटींच्या भव्य स्मारकाचा स्वतंत्र प्रस्ताव मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असल्याचेही राधाकृष्ण विखे यांनी सांगितले आहे.

आणखी वाचा

Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र….

अधिक पाहा..

Comments are closed.