मुंडेंच्या चेलेचपाट्यांनी देशमुखांचा खून पाडला, तो शास्त्रींना मान्य आहे का? अंबादास दानवेंचा प
नामदेव शास्त्रीवरील अंबडास डॅनवे: संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर (Santosh Deshmukh Murder Case) मागील दीड महिन्यापासून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर आरोप असून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच गुरुवारी धनंजय मुंडे हे भगवानगडावर दाखल झाले होते. शुक्रवारी (दि. 31) नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांनी धनंजय मुंडे यांना भक्कमपणे पाठिंबा दर्शविला. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणूनबुजून गुन्हेगार ठरवले जात आहे, असे त्यांनी म्हटले. आता नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
अंबादास दानवे म्हणाले की, संतांनी आशीर्वाद दिला पाहिजे, पण तो गुन्हेगारांना नाही. संत सर्व जाती-धर्माचे असतात. कोणत्याही एका जातीपातीचे नसतात. त्या पद्धतीने संतांनी आशीर्वाद दिले पाहिजे. धनंजय मुंडे यांच्या चेलेचपाट्यांनी संतोष देशमुखांचा खून पाडला, तो शास्त्री यांना मान्य आहे का? हा माझा सवाल आहे. मी व्यक्तिगत बोलत नाही. पण, कोणत्याही गुन्हेगारांची पाठराखण संतांनी करणे चुकीचे आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
महाराष्ट्राचा भ्रमनिरास झालाय
आज शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे. याबाबत विचारले असता अंबादास दानवे म्हणाले की, महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आलेला आहे. खरं तर बिहार आणि आंध्र प्रदेशने ज्या पद्धतीने केंद्र सरकारच्या छातीवर बसून आपल्या राज्यासाठी वेगवेगळ्या विकासाचे प्रकल्प घेऊन गेले. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गद्दारी करून झालेले दोन उपमुख्यमंत्री यांनी पळीभर पाण्यामध्ये म्हणजे चुल्लू भर पाण्यामध्ये डुबून जीव द्यावा. महाराष्ट्राच्या वाट्याला काही नाही. महाराष्ट्राचा भ्रमनिरास झाला आहे, असे त्यांनी म्हटले.
जनतेला आधार न देणारे सरकार
अंबादास दानवे पुढे म्हणाले की, त्याच-त्याच घोषणा 2014 पासून हे सरकार करत आहे. नुसत्या घोषणा आहेत. कृषी क्षेत्राबाबत ज्या घोषणा केल्यात त्या योग्य नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेच्या वाट्याला या बजेटमधून काही आलेलं नाही. फक्त घोषणांचा पाऊस आणि घोषणांचा सुकाळ या बजेटमध्ये आहे. मागच्या काळामध्ये ज्या तरतुदी झाल्या त्यावेळी “सप्तऋषी” म्हणून घोषणा गेल्या वेळेस केली होती. मात्र या घोषणेतून कोणत्या सप्तऋषीचा विकास झाला हे सांगितलं पाहिजे. आता मोठं नाव देऊन चार इंजिन असं सांगण्यात आलं. मात्र या चार इंजिनमध्ये कसं काम करणार? निर्यात वाढ कशी करणार? कांद्याची निर्यात वाढ, सोयाबीनची निर्यात वाढ कशी करणार? याबाबत काही सांगितलं गेलं नाही. जनतेला, शेतकऱ्यांना, युवकांना कोणताही आधार न देणारे हे सरकार आहे. बारा लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 10 टक्के टॅक्स भरावा लागणार आहे. घोषणा वेगळी केली. मात्र, बारा लाखापर्यंत दहा टक्के टॅक्स भरावा लागणार आहे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.