नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; पंकजांची पहिली प्रतिक्रिया, राजीनाम्यावरही भाष्य
जालना : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण, बीडमधील गुन्हेगारी आणि खंडणी प्रकरणावरुन राजकारण चांगलंच तापलं असून मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) राजीनाम्याची मागणी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर वाढता दबाव लक्षात घेऊन धनंजय मुंडेंनी भगवान गडावर जाऊन महंत नामदेव शास्त्रींची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. तर, या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी नामदेव शास्त्रींनी (Namdeo shastri) धनजंय मुंडेंच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद घेऊन धनंजय गुन्हेगार नाही हे मी 100 टक्के खात्रीने सांगतो असे त्यांनी म्हटले. तसेच, खून करणाऱ्या आरोपींच्या मानसिकतेचा विचार व्हावा, अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. त्यावरुन, सोशल मिडिया व राजकीय वर्तुळातून नामदेव शास्त्रींवर टीकेची झोड उठली. तसेच, काहींनी पंकजा मुंडेंना (Pankaja munde) व धनंजय मुंडेंना वेगळा न्याय का, असा सवालही उपस्थित केला होता. आता, नामदेव शास्त्रींची भूमिका आणि धनंजय मुंडेंची पाठराखण यासंदर्भात पंकजा मुंडेंनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली असून त्यांच्या समर्थनार्थ भक्कपणे पाठिशी असल्याचंही त्यांनी म्हटलं. यासंदर्भात पंकजा मुंडेंना जालन्यातील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी अधिकचं बोलणं टाळलं. ”त्यांची त्यांची भूमिका आहे, त्यावर मी भूमिका व्यक्त करण्याची आवश्यकता वाटत नाही, असे पंकजा मुंडेंनी म्हटलं. तर, धनंजय देशमुख हे भगवान गडावर जाणार आहेत, यावरही त्यांनी प्रतिक्रिया देताना, प्रत्येक व्यक्तीच्या भूमिकेवर व्यक्त होण्याने फक्त बातमी होते, बाकी काही नाही, असे म्हणत पंकजा मुंडेंनी नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर आणि धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यावर बोलणे टाळल्याचे दिसून आले.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा दबाव कुठे आहे?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः विषय अजून तसा धनंजयकडे केला नाही. त्यामुळे मला कळत नाही, कुठे दबाव आहे. स्वतः अजित पवारांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, त्यात संबंध आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू. पण, संबंध नसेल तर अन्याय व्हायला नको, हा अजित दादांचा निर्णय आहे, असे म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरही स्पष्टपणे भाष्य केलं.
त्यांच्यावर मी व्यक्त होत नाही – पंकजा
मनसेचे प्रकाश महाजन यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचा संदर्भ देत धनंजय मुंडेंवर टीका केली होती. त्यासंदर्भात पंकजा मुंडेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांचे ते व्यक्त होतात, मी त्यांच्यावर कधी व्यक्त होत नाही, ते स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत, तसेच ते दुसऱ्या पक्षाचे नेते आहेत, असे म्हणत पंकजा मुंडेंनी प्रकाश महाजन यांच्या वक्तव्यावर अधिकचं बोलणं टाळलं
अधिक पाहा..
Comments are closed.