स्वतःची चूक झाकण्यासाठी डीवचू नका, जरांगेंचा नामदेव शास्त्रींवर निशाणा म्हणाले, ‘जातीयवादाचा नव

हात जरेंगे: सरपंच संतोष देशमुख प्रकरणात भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री(Namdeo Shastri) यांनी उडी घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे .मनामध्ये धनंजय मुंडे खंडणी प्रकरणातील गुन्हेगार नाहीत हे 100% खात्रीने सांगतो असं वक्तव्य केल्यानंतर आज धनंजय देशमुख महंत नामदेव शास्त्रींची भेट घेणार आहेत .दरम्यान, मराठा आरक्षण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे यांनी नामदेवशास्त्रींवर हल्लाबोल केलाय . स्वतःची चूक झाकण्यासाठी डीवचू नका,तुमच्याकडून चूक झाली आहे .एका समाजाला बाजूला नेण्याचं काम झालं आहे ,असं मनोज जरांगे (Manoj Jarange ) म्हणाले .  ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे तिथेही जातीयवाद होऊ शकतो .जातिवादाचा नवा अंक ते देऊन गेले आहेत असं जरांगे म्हणाले . (Santosh Deshmukh Case)

काय म्हणाले मनोज जरांगे?

महंत नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज धनंजय देशमुख कुटुंबीयांसह भगवानगडावर जाणार आहे .यावर मनोज जरांगे म्हणाले,हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कुटुंबांनं जावं. महाराजांना जे बोलायचं होतं ते बोलून गेले .जातीयवादाचा नवीन अंक देऊन गेले .नामदेव शास्त्री आरोपींचा समर्थन करत आहे .संतोष देशमुख यांची हत्या केली म्हणून आरोपींना आनंद वाटला असेल .ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे तिथेही जातीयवाद होऊ शकतो .याचा नवीन अंक पाहायला मिळत आहे असं मनोज जरंगे म्हणाले . (Manoj Jarange)

आम्ही तुमचा सन्मान करतो पण आपण आपलं बघावं दुसऱ्याकडे डोकावून पाहू नका .स्वतःची चूक झाकण्यासाठी डीवचू नका . तुमच्याकडून चूक झाली आहे .एका समाजाला एका बाजूला नेण्याचं काम झालं आहे .जातीय सलोखा बिघडवायला नको होता .पण धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे चौथा अंक पाहायला मिळाला .आरोपींच्या बाजूने मोर्चे निघाले .जातीयवादाचा अंक भयंकर आहे .असं मनोज जरांगे म्हणाले . (Santosh Deshmukh Case)

संतोष देशमुख जाणार भगवानगडावर

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता दोन महिने होत आले आहेत .या प्रकरणात संत महंतांनी उडी घेतल्याने राजकीय वातावरण तापू लागलं आहे . बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर मुक्कामी गेले होते .त्यानंतर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे निर्दोष असल्याचं सांगितलं .यानंतर धनंजय देशमुख यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब भगवानगडावर आज जाणार आहे .या संपूर्ण प्रकरणातील सर्व पुरावे नामदेव शास्त्री यांच्या समोर ठेवत न्यायाची मागणी करणार आहेत .

हेही वाचा:

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे समाधी अवस्थेकडे पोहोचले…; शिंदेंच्या आमदाराचा दावा, संजय राऊतांचा गौप्यस्फोट

अधिक पाहा..

Comments are closed.