अभिषेकनं मुंबईचं मैदान गाजवलं, तुझा अभिमान वाटतो… युवराज सिंगचं एका ओळीचं ट्विट
मुंबई : भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) यांच्यातील पाच सामन्यांची मालिका भारतानं 4-1 अशी जिंकली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पाचव्या टी 20 सामन्यात भारतानं इंग्लंडला 150 धावांनी पराभूत केलं. भारताच्या या विजयात सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याची स्फोटक फलंदाजी त्यानंतर गोलंदाजी महत्त्वाची ठरली. अभिषेक शर्मानं सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. अभिषेक शर्मानं 135 धावा केल्या याशिवाय 2 विकेट अन् एक कॅच घेतला. अभिषेक शर्माची आक्रमक फलंदाजी पाहून त्याचा गुरु असलेल्या युवराज सिंगनं (Yuvraj Singh) तुझा अभिमान वाटतो अशा आशयाची पोस्ट केली. तर, प्लेअर ऑफ द मॅच ठरल्यानंतर बोलताना अभिषेक शर्मानं युवी पाजी आनंदी असतील, असं म्हटलं.
अभिषेक शर्माची स्फोटक कामगिरी
मुंबईत इंग्लंडनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय इंग्लंडच्या अंगलट आला. संजू सॅमसननं आक्रमक सुरुवात केली त्यानं दोन षटकार लगावले. मात्र तो लवकर बाद झाला. यानंतर अभिषेक शर्मानं सुरुवातीला तिलक शर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग यांच्या मदतीनं सामन्यावर भारताचं वर्चस्व कायम ठेवलं. अभिषेक शर्मानं 17 बॉलमध्ये 50 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर पुढे चौकार आणि षटकार मारत 37 धावांमध्ये 100 धावांचा टप्पा ओलांडला. अभिषेक शर्मानं 54 बॉलमध्ये 135 धावा केल्या. यामध्ये त्यानं 7 चौकार आणि 13 षटकार मारले. यामुळं भारतानं 247 धावांचा डोंगर उभा केला. गोलंदाजी करताना अभिषेक शर्मानं दोन विकेट घेतल्या.
युवराज सिंगकडून अभिषेक शर्माचं अभिनंदन
युवराज सिंगनं अभिषेक शर्मानं केलेल्या कामगिरीचं कौतु करणारी पोस्ट एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली. अभिषेक शर्मा चांगला खेळलास, मला तुला अशीच कामगिरी करताना पाहायचं होतं, तुझा खूप अभिमान वाटतो, अशी पोस्ट केली. अभिषेक चौकार आणि षटकार मारत इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाईज्या वेळी करत होता तेव्हाच युवराज सिंगनं ही पोस्ट केली.
चांगले खेळले @Iamabhisarma4! तिथेच मला तुला भेटायचे आहे! 🔥 आपला अभिमान आहे 👊🏻💯#Indvseng
– युवराज सिंग (@युवस्ट्रांग 12) 2 फेब्रुवारी, 2025
युवी पाजी आनंदी असतील…
अभिषेक शर्मानं केलेली 135 धावांची खेळी आणि एका ओव्हरमध्ये घेतलेल्या दोन विकेट, एक कॅच यामुळं प्लेअर ऑफ द मॅच हा किताब त्याला देण्यात आला. यावेळी अभिषेक शर्मानं गुरु युवराज सिंगची आठवण काढली. तो म्हणाला युवी पाजी आनंदी असतील, मी नेहमी 15 ते 16 ओव्हपर्यंत खेळावं अशी त्यांची अपेक्षा असते, असं अभिषेक शर्मा म्हणाला.
अभिषेक शर्मा म्हणाले, “मला वाटते की कदाचित युवी पाजी आनंदी असतील, मी नेहमीच 15 किंवा 16 षटकांपर्यंत फलंदाजी करावी अशी त्याची इच्छा होती”. pic.twitter.com/11lpedo4cl
– जॉन्स. (@Criccrazyjhons) 2 फेब्रुवारी, 2025
दरम्यान, युवराज सिंगनं 2007 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. स्टुअर्ट ब्रॉडला एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारले होते. आज त्याच्या शिष्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांनी 13 षटकार मारत दणदणीत शतक केलं.
इतर बातम्या :
अधिक पाहा..
Comments are closed.