देवेंद्र फडणवीस अन् अजित पवारांना दिलेला अल्टिमेटम संपला; अंजली दमानियांची मोठी घोषणा, उद्या…

संतोष देशमुख खुनाच्या प्रकरणात अंजली दमानिया: राज्य सरकारला मी चार दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. चार दिवसांमध्ये राज्य सरकारने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा घेतला पाहिजे होता. परंतु सरकारने राजीनामा घेतला नाही, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केली. तसेच या चार दिवसांमध्ये मी पुरावा गोळा केले आहेत. उद्या (4 फेब्रुवारी) सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंबद्दल मोठा खुलासा करणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भेटले. मात्र धनंजय मुंडे दोघांचे अतिशय जवळचे असल्यामुळे धनंजय मुंडेंवर कारवाई होत नाहीय. जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार नाही तो पर्यंत या प्रकरणात न्याय होणार नाही. धनंजय मुंडे हे एक मंत्री म्हणून मला मान्य नाही.  जर असे लोक जे दहशतवाद करतात, अत्याचार करतात, वाल्मिक कराड आणि कैलास फडसारख्या लोकांना मोठा करतात, अशा लोकांना विधानसभेत जाऊन सामान्य जनतेसाठी न्याय बनवणार असणार तर आम्हाला मान्य नाही, असं अंजली दमानिया यांनी सांगितले.

उद्या पत्रकार परिषदेत भ्रष्टाचाराचा खूप मोठा खुलासा करणार- अंजली दमानिया

आतापर्यंत आपण मुख्यमंत्री  आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या राख घोटाळा, काळे पैसे त्यांच्या खात्यात कसे आले, सरकारी कंपनीचा फायदा एका मंत्राला कसा झाला, हे दाखवलं. त्यांच्या जमिनी दाखवल्या. त्यांच्या आर्थिक व्यवहार दाखवला, त्यांच्या आणि वाल्मिकी कराड यांच्या जवळीक दाखवले. उद्या जे मी पत्रकार परिषद घेऊन पुरावा दाखवणार असून मंत्री असताना भ्रष्टाचाराचा खूप मोठा खुलासा असणार आहे. कसा यंत्रणांच्या गैरवापर केला जातो त्याच्या देखील खुलासा करणार आहे, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली. तसेच हे पुरावे मी भगवानगडावर देणार आहे, आणि मागणी करणार आहे तुम्ही दिलेला त्यांना पाठिंबा काढून घ्या. दुसरी मागणी अशी असेल हे पुरावा मी जे दिले, हे तुम्हाला जर योग्य वाटत असेल, तर त्यांनी तरी धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी करायला हवी. असं जर झालं तर पूर्ण महाराष्ट्र भगवानगडाला नमन करेल, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहे, तोपर्यंत इथे न्याय होणार नाही- अंजली दमानिया

नामदेव शास्त्री महाराज जर खरंच देशमुख कुटुंबीयांचा पाठीमागे असतील, तर त्यांनी त्या देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी जी विघ्न आहेत ती दूर करावी अशी विनंती आहे. त्यातला सर्वात मोठा विघ्न म्हणजे धनंजय मुंडे…धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहे, तोपर्यंत इथे न्याय होणार नाही. म्हणून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं काम आता भगवानगडानेच करायला हवं. त्यानंतरच देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेल, असं अंजली दमानिया यांनी सांगितले.

अंजली दमानिया काय काय म्हणाल्या?, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=wepat_2vfbw

संबंधित बातमी:

Manoj Jarange: मोठी बातमी : धनंजय मुंडे रात्री 2 वाजता भेटले, वाल्मिक कराडही होते, सगळे पाया पडले, निवडणुकीपूर्वीच्या भेटीबाबत जरांगेंचा गौप्यस्फोट

अधिक पाहा..

Comments are closed.