बजेटनंतर सोन्याचे दर किती रुपयांवर पोहोचले? चांदीचा दर 1 लाख रुपयांवर,मुंबईत सोनं किती रुपयांवर
नवी दिल्ली : अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सोने आणि चांदीच्यादरात तेजी पाहायला मिळाली होती. जागतिक अस्थिरता, शेअर बाजारातील घसरण यामुळं गुंतवणूकदारांकडून सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने खरेदीला प्राधान्य दिलं जातंय. एमसीएक्सवर मार्च महिन्याच्या सोन्याच्या वायद्यामध्ये वाढ दिसून आली. सराफा बाजारात मात्र सोन्याचे दर 10 रुपयांनी घसरल्याचं पाहायला मिळालं. भारतात 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 84650 रुपये आहे. आज सोन्याच्या दरात 10 रुपयांची घसरण झाली. 22 कॅरेट सोन्याच्या दरात देखील 10 रुपयांची घसरण झाली. 22 कॅरेट सोन्याचा दर 77610 रुपये आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याप्रमाणं चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. चांदीचे एक किलोचे दर 102500 रुपयांवर पोहोचले आहेत. एमसीएक्सवर 4 मार्चच्या सोन्याच्या वायद्याचे दर 82405 तर चांदीचे दर 93027 रुपये इतके आहेत.
मंबईतील सोन्याचे दर
मुंबईत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 84050 रुपये इतका आहे. तर, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 77050 रुपये इतका आहे.
नवी दिल्लीत सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. रविवारी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 84513 रुपये इतका होता.त्यामध्ये आज 140 रुपयांची वाढ होऊन 84653 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. नवी दिल्लीत सोन्याचा दर 102500 रुपये आहे.
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये देखील सोन्याच्या दरात 140 रुपयांची वाढ झाली आहे. या शहरात सोन्याचा दर 84146 रुपयांवर पोहोचला आहे. तर, चांदीचा दर 102900 प्रति किलो इतका आहे.
लखनौमध्ये देखील सोन्याच्या दरात 140 रुपयांची वाढ झाली आहे. लखनौमध्ये 10 ग्रॅम सोनं 84669 रुपयांना विकलं जात आहे. लखनौ शहरात देखील चांदीचा 1 लाखांवर असून चांदीचा दर 103400 रुपये प्रतिकिलो इतका आहे.
चंदीगडमध्ये 10 ग्रॅम सोन्याचादर 84662 रुपयांवर पोहोचला आहे. 2 फेब्रुवारीच्या तुलनेत सोन्याचे दर या शहरातदेखील 140 रुपयांनी वाढले आहेत. अमृतसरमध्ये 10 ग्रॅम सोनं 84680 रुपये आहेत. चंदीगडमध्ये चांदीचा दर 101900 रुपयांवर पोहोचला आहे.
सोन्यातील गुंतवणूक का वाढली?
जागतिक अस्थिरतेचं वातावरण, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केलेलं व्यापार युद्ध यामुळं भांडवली बाजाराऐवजी गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीच्या सुरक्षेचा पर्याय म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक केली जात आहे. भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांकडून काढता पाय घेतला जात आहे.जानेवारी महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी 70 हजार कोटी रुपये काढून घेतले. त्यामुळं शेअर बाजारात घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांनी त्यामुळं सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतं.
इतर बातम्या :
अधिक पाहा..
Comments are closed.