‘तुमच्या मुलीशी लग्न करायचंय’ ऐकताच मुलीचा बाप संतापला, नंतर धमकी देत कुकृत्याचं टोक गाठलं; भय

पुणे: पुण्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नाची मागणी घातली म्हणून मारहाण (Pune Crime News) करत एकाचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. तुमच्या मुली बरोबर लग्न करायचं आहे,’ अशी मागणी करणाऱ्याचा चार जणांनी मिळून केलेल्या मारहाणीत जीव (Pune Crime News) गेल्याची घटना गोखलेनगर येथील शहीद तुकाराम ओंबाळे मैदानात घडली आहे. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा (Pune Crime News) गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

नेमकं काय घडलं?

दिलीप यल्लपा अलकुंटे (वय 45, रा. जनता वसाहत) असे मृत्यू झालेल्या कामगाराचं (Pune Crime News) नाव आहे. त्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी रामजी निलू राठोड (वय 50), अनुसया रामजी राठोड (वय 45), करण रामजी राठोड (वय 19) यांच्यासह यांच्या प्रथम खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना दिलीप अलकुंटे या व्यक्तीचा मृत्यू (Pune Crime News) झाला. त्यानंतर आरोपींच्या विरोधात कलमामध्ये वाढ करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, रामजी व अनुसया यांना अटक करण्यात आल्याचे चतुः श्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजयानंद पाटील यांनी सांगितले.

तुझे वय काय, आमच्या मुलीचे वय काय?

या प्रकरणी दिलीप अलकुंटे यांच्या वहिनी पुष्पा राजेश अलकुंटे यांनी चतुः श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ही घटना शनिवारी (1 फेब्रुवारी) रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास गोखलेनगर येथील ओंबाळे मैदानावर घडली. दिलीप अलकुंटे यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. ते एका गॅरेजवर काम करतात. तर आरोपी रामजी राठोड हे बिगारी कामगार म्हणून काम करतात. दिलीप अलकुंटे यांनी रामजी राठोड यांच्याकडे त्यांच्या मुलीशी लग्न करायचे असल्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या वेळी आरोपींनी ‘तुझे वय काय’, ‘आमच्या मुलीचे वय काय’ असे म्हणत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.

उपचार सुरू असताना झाला मृत्यू

त्यानंतर, याला आता जिवंत गाडू, अशी धमकी देत आरोपी दिलीपला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दिलीप गंभीर जखमी झाले. चतुःश्रृंगी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी असलेल्या दिलीप यांना ससून रुग्णालयात दाखल केलं, तसेच आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. मात्र, काल (रविवारी ता- 2) सकाळी दिलीपचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर आरोपींविरोधात खुनाच्या गुन्ह्याचे कलम वाढवण्यात आले आहे.

अधिक पाहा..

Comments are closed.