मॅरेज ब्युरोवरून ओळख, विधवा महिलेशी लग्न करून फसवलं; ‘लखोबा लोखंडे’ 17 लाख घेऊन पसार

मुंबई : उतारवयात एकटी पडण्याच्या चिंतेने कुटुंबीयांनी विधवा महिलेला लग्न करायला लावलं. पण मॅरेज ब्युरोवरून ओळख झालेला व्यक्ती हा ठग लखोबा लोखंडे निघाला. लग्न झाल्यानंतर त्या ठगाने महिलेची फसवणूक करत तिच्याकडील 17 लाखांचा मुद्देमाल घेऊन पसार झाला. दिंडोशीमध्ये ही घटना घडली असून प्रदीप नाईक असं आरोपीचं नाव आहे. त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मॅट्रिमनी साईटवरून ओळख

दिंडोशीतील एक 50 वर्षीय महिलेची 28 वर्षांची मुलगी आहे. त्या मुलीचे लग्न ठरल्यानंतर आपली विधवा आई घरी एकटीच पडणार ही चिंता तिला सतावत होती. त्यानंतर तिने अनेक मॅरेज ब्युरोंवर तिच्या आईचे नाव नोंदवले. त्याचवेळी त्यांना अपेक्षित असलेला वरही मिळाला. प्रदीप नाईक असं त्याचं नाव होतं.

दोघेही एकमेकांना भेटले, पुढे संवादही होत गेला. या दरम्यान प्रदीप नाईक यांने तिच्या पत्नीचे आणि मुलीचे कोविड काळात निधन झाल्याची माहिती दिली. नंतर त्या विधवा महिलेला विश्वास संपादन केला आणि त्यांनी लग्न केलं.

सोने, चांदी, रोख रक्कम घेऊन पसार

लग्न झाल्यानंतर प्रदीप नाईकने त्या महिलेचे सोन्याचे आणि चांदीचे सर्व दागिने ताब्यात घेतले. त्याचसोबत दीड लाखांची रोख रक्कमही घेतली. त्या महिलेला कोड्रिंकमधून गुंगीचे औषध दिले आणि सर्व मुद्देमाल घेऊन पसार झाला.

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्या महिलेने तिच्या मुलीला बोलावून घेतलं आणि सगळी हकिकत सांगितली. आरोपीने 29.5 तोळे सोने, 1.5 किलो चांदी व 1.50 लाख रोख रक्कम असा एकूण 17 लाख 15 हजारांचा ऐवज घेऊन पळ काढला.

प्रदीप नाईकने ज्या ठिकाणी कामाला असल्याचं सांगितलं त्या ठिकाणी नंतर चौकशी केली असता त्याने कोरोना काळातच काम सोडल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी दिंडोशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस आरोपीच्या शोधात आहेत.

फसवणूक करून चोरी केलेल्या दागिन्यांचे वर्णन खालीलप्रमाणेः-

1. सोन्याचा मोहनहार । एकूण साडेपाच तोळे, किं.अं. 2,75,000/- रु.
2. एक गोल्डन काउंटी, 2 एकूण किंवा. 2,00,000/-.
3. सोन्याचा लक्ष्मीहार 1 एकूण तीन तोळे, किं.अं. 1,50,000/- रु.
4. सोन्याची अंगठी 10 एकूण चार तोळे, किं.अं. 2,00,000/- रु.
5. सोन्याची माळ 1 एकूण एक तोळे, किं.अं. 50,000/- रु.
6. मुलगी कान साखली 2 एकूण साधन, किंवा. 50,000/- धूप.
7. सोन्याचे नेकलेस 3 एकूण सात तोळे, किं.अं. 3,50,000/- रु.
8. सोन्याचे कानातल्या रिंग्स 4 जोडी एकूण 4 तोळे, किं.अं. 2,00,000/- रु.
… 90,000/- रु. आणि रोख रक्कम १,50०,०००/- रु.

एकूण- 29.5 तोळे सोने, 1.5 किलो चांदी व 1.50 लाख रोख रक्कम,

एकूण किंमत 17,15,000/-रु.

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..

Comments are closed.