मुलीनं लव्ह मॅरेज केलं, पालकांचं कडाक्याचं भांडण; वडिलांनी कोयता अन् कुकरच्या झाकणाने मारहाण कर

नाशिक गुन्हा: नाशिक शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पतीने पत्नीचा कोयता आणि कुकरच्या झाकणाने वार करत खून केल्याची घटना गंगापूर रोड (Gangapur Road) परिसरात घडली आहे. मुलीने प्रेम विवाह केल्याने गेल्या काही दिवसांपासून पती आणि पत्नीमध्ये वाद सुरु होते. याच वादातून पतीने पत्नीला मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर रोडवरील डी. के. नगर भागात असलेल्या स्वास्तिक निवास (बी-विंग) सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरील गोरे दाम्पत्य हे मुलासह भाडेतत्वावर सदनिकेत राहत होते. मंगळवारी मुलगा सकाळी कामावर निघून गेल्यानंतर सविता-छत्रगुन हे पती-पत्नी घरात एकटेच होते. दुपारी पती-पत्नीमध्ये भांडण झाले. यावेळी छत्रगुन गोरे (५०) याने रागाच्या भरात बायकोच्या डोक्यात कोयता व कुकरचे झाकणाने जोरदार प्रहार केला.

पतीने केली पत्नीची हत्या

यामुळे सविता गोरे या रक्तबंबाळ अवस्थेत लाकडी पलंगावर कोसळल्या. यावेळी त्यांची विवाहित मुलगी फिर्यादी मुक्ता बालाजी लिखे ही त्याचवेळी घरी आल्यानंतर दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा वाजविल्यानंतर तिचे वडील छत्रगुनने दरवाजा उघडला असता आई रक्तबंबाळ अवस्थेत बेडरूममध्ये पडलेली आढळून आली.

फरार पतीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मात्र छत्रगुन हा फरार झाला होता. मुक्ता हिने शेजाऱ्यांचे दार वाजवून मदत मागितली यावेळी रहिवाशांनी धाव घेतली.  या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीने प्रेम विवाह केल्याने गेल्या काही दिवसांपासून पती आणि पत्नीमध्ये वाद सुरु होते. याच वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तर फरार पतीस पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत.

पंचवटीत महिलेचा विनयभंग

दरम्यान, वडजाई मातानगर परिसरात राहत्या घराजवळ महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. संशयित खुशाल माळी याने मखमलाबाद रोडवरील वडजाईमातानगर येथे येऊन राहत्या घराजवळ फिर्यादीचा हात पकडला. तू माझा फोन का उचलत नाही? माझ्याशी का बोलत नाही, असे बोलून महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच फिर्यादी महिलेने घाबरून घराचा दरवाजा बंद करून घरात बसलेली असताना घराचा दरवाजा वाजवून शिवीगाळ, दमदाटी केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nandurbar News : रस्ता नसल्याने महिलेची घरीच प्रसुती, बाळ दगावलं, आईची तब्येत खालावल्याने बांबूच्या झोळीतून 15 किमीचा जीवघेणा प्रवास, नंदुरबारमधील धक्कादायक घटना

Bhandara : चालकाला आली झोपेची डूलकी अन् क्षणात होत्याचं झालं नव्हतं! DJ वाहनाचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर, तीन गंभीर

अधिक पाहा..

Comments are closed.