वाल्मिक कराडने माझ्यावर जिल्हाधिकाऱ्यांसमोर हात उगारला, करुणा शर्मांचे खळबळजनक आरोप

वलमिक कराडवरील करुणा शर्मा: “ज्या वाल्मिक कराडशी (वलमिक कराड) असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे मंत्री धनंजय मुंडेंची (धनंजय मुंडे) गोची झालीय, त्याच वाल्मिक कराडने जिल्हाधिकाऱ्यांसमोर हात उगारल्याचा करुणा शर्मा यांनी केलाय. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या.

करुणा मुंडे म्हणाल्या, माझी मागणी आहे की , जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांच्यावर कारवाई करा. कारण त्यांच्या समोर मला मारहाण झाली. वाल्मिक कराडने मला मारहाण केली. माझा नवरा सुधा तिथं होता त्याने वाल्मिक कराडला रोखलं नाही. माझ्या गाडीत यांनी बीडमधे दोन बंदूक ठेवल्या जेणेकरून पुढील दोन अडीच वर्ष जेलमध्ये राहील. यांना माझी आर्थिक कोंडी करून माझ्याकडून लिहून घ्यायचं आहे की, मी धनंजय मुंडे यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशन मधे राहिले होते. परंतु मी त्यांच्यासोबत 27 वर्ष संसार केला आहे.

धनंजय मुंडेंनी करूणा मुंडेंवर कौटुंबिक हिंसाचार केल्याचं कौटुंबिक न्यायालयानं अंशतः मान्य केलंय. तसंच महिन्यापोटी दोन लाखांची पोटगी देण्याचा अंतरीम आदेशही दिलाय..कोर्टाच्या निर्णय आला आणि करुणा मुंडेंच्या अश्रूंचा बांध फुटला…या अश्रूंमागचा भाव कळण्याचा काही मार्ग नव्हता..डोळ्यातून अश्रू तर मुखातून आरोपांची गंगा वाहू लागलीये…

करुणा शर्मा काय काय म्हणाल्या?

करुणा शर्मा म्हणाल्या, माझा केवळ कोर्टावर विश्वास आहे. मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही केवळ कोर्ट न्याय देऊ शकते. मी महिला आयोगाला अनेकवेळा पत्र लिहिल मात्र रुपाली चाकणकर काहीच कामाच्या नाहीत. त्या उलट आरोपीच्या बाजूने बाईट देत आहेत. त्यांना बदला म्हणून मी राष्ट्रीय महिला आयोगात गेले आहे. आर्थिक निकषावर कोर्टाने निर्णय दिला आहे. मी याविरोधात हायकोर्टात जाणार आहे कारण माझा मासिक खर्च मोठा आहे. 1 लाख 74 हजार घराच भाड आहे मी ते कुठून भरून? मागील ७ महिन्याच भाड पेंडीग आहे. माझी मुलगी आता लग्नाला आली आहे. आता मी दुसर लग्न करू शकत नाही. मुलीच लग्न करायचं आहे त्यासाठी पैसा गरजेचं आहे.  माझं स्पष्ट म्हणणं आहे कितीही दबाव आला तरी घाबरू नका लढत रहा.

सिशिव मुंडेंने करुणा शर्मांवर कोणते आरोप केलेत?

करुणा शर्मा म्हणाल्या, मी सिशिव धनंजय मुंडे. आमच्या कौटुंबिक समस्येला मनोरंजनाचं साधन बनवलं जात असल्यानं मला बोलणं भाग आहे. माझे वडील धनंजय मुंडे सर्वोत्तम नसले तरी ते आमच्यासाठी आईएवढे वाईट नाहीत. आमची आई ट्रॉम्याचा सामना करताना आम्हालाच वाईट पद्धतीनं त्रास द्यायची.कौटुंबिक छळ झाल्याचा ती जो दावा करते तो खरं तर तिने आमचा म्हणजे मी, माझी बहीण आणि माझ्या वडिलांचा छळ केलाय. माझ्या वडिलांना तिनं मारहाण केली त्यामुळे वडील घरातून निघून गेले. तीने आम्हालाही निघून जायला सांगत संबंध तोडले होते. २०२० पासून माझे वडीलच माझी काळजी घेतायत. माझ्या आईला कसलीही आर्थिक अडचण नाही. गृहकर्जाचे हफ्ते सुद्धा मुद्दाम थकवले . माझ्या वडिलांवर सूड उगवण्यासाठीच ती काही ना काही बनाव रचत राहते.

https://www.youtube.com/watch?v=ZJMCVDHSQOK

इतर महत्त्वाच्या बातम्या

Video: आया रे तुफान… सिंहाच्या जबड्यात हात; ‘छावा’ सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला

अधिक पाहा..

Comments are closed.