राहुल गांधी-संजय राऊतांसमोर सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंचं नाव घेतलं; दिल्लीत काय घडलं?, VIDEO
राज ठाकरे वर राहुल गांधी सुपिया सुले नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. राहुल गांधी यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (सुप्रिया सुले) यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीआधी तब्बल 39 लाख मतदार कसे वाढले असा सवाल त्यांनी केलाय. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या प्रौढ मतदारांच्या लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक आहे असा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगाने तातडीने लोकसभा आणि विधानसभेची फोटोसह मतदारयादी आपल्याला द्वावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील देखील याठिकाणी उपस्थित आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या लोकसभा मतदारसंघातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उत्तम जानकर यंदा आमदार म्हणून निवडून आले. मात्र उत्तम जानकर यांचं असं म्हणणं आहे की, मी निवडून आलो आहे, परंतु मतदान जे व्हायला हवं होतं, तसे झाले नाही. त्यामुळे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर देखील उत्तम जानकर बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या, अशी मागणी करत आहेत. तसेच महाराष्ट्रत असे अनेक विधानसभा मतदारसंघात घडले आहे.
सुप्रिया सुळेंनी राहुल गांधी, संजय राऊतांसमोर राज ठाकरेंचंही घेतलं नाव-
सुप्रिया सुळेंनी राहुल गांधी, संजय राऊतांसमोर पत्रकार परिषदेत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं नावही घेतलं. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील ईव्हीएम मशीनवर शंका व्यक्त केली आहे. राज ठाकरे पण म्हणाले की, मनसेचा एक उमेदवार आहे, त्याला स्वत:चं देखील मत मिळालेलं नाही, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. याबाबतचा सर्व डेटा तुमच्यासमोर आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत दिली.
#वॉच | महाराष्ट्र निवडणूक 2024 | एएनआयच्या एका प्रश्नाला उत्तर देताना लोकसभा लोप आणि कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणतात, “आम्हाला दोन गोष्टींमधील फरक स्पष्टपणे सादर करण्याची गरज आहे. एक असा अंदाज आहे – एक असे म्हणू शकते की मशीनमध्ये समस्या आहेत. दुसरे म्हणजे खरं म्हणजे. मी. … pic.twitter.com/o08thl0qrw
– वर्षे (@अनी) 7 फेब्रुवारी, 2025
https://www.youtube.com/watch?v=7-rpkjkdfyk
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.