ऑपरेशन टायगरला धाराशिवमध्ये अपयशच! ओमराजे निंबाळकरांवर शिवसैनिकांचा कितपत विश्वास?
धारशिव: राज्यात शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. उध्दव ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचं बोलले जात असताना धाराशिव येथील उध्दव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं बोलले जात आहे. ओमराजे ठाकरेंची साथ सोडतील का ? मतदारसंघासाठी निधी मिळत नसेल तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे का ? ओमराजे समर्थक यांना आपल्या नेत्याबाबत काय वाटते, किती विश्वास आहे ? हे धाराशिवमधील शिवसैनिकांना विचारले असता ओमराजे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाहीत यावर 1000% विश्वास असल्याचं शिवसैनिकांनी सांगितले. राज्यात शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा असताना राज्याच्या विरोधी पक्षाची भूमिका धाराशिवमधून पार पाडली जाईल असा विश्वास युवा शिवसैनिकांनी व्यक्त केला. (Shivsena)
ऑपरेशन टायगर
शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू झालं असून शिवसेना ठाकरे गटातील अनेक आमदार-खासदार आमच्या संपर्कात आहेत. योग्यवेळी ते आमच्या शिवसेना पक्षात प्रवेश करतील असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले होते. मात्र, ठाकरेंच्या खासदाराने ऑपरेशन टायगरची खिल्ली उडवली आहे. उदय सामंत उपमुख्यमंत्री होणार आणि शिवसेना फुटणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतरच ऑपरेशन टायगरची बातमी पेरल्याचं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं होतं.शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी खिल्ली उडवली होती. कसलं ऑपरेशन टायगर. इथं यवतमाळहून आलेला वाघ हिंडायलाय तो आधी पकडा, असा टोला ओमराजे निंबाळकर यांनी सत्ताधाऱ्यांना व शिवसेनेच्या मंत्र्यांना लगावला होता. (Omraje Nimbalkar)
संकटकाळात मी पक्षासोबतच
दरम्यान, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यातील आमदार-खसादारांच्या शिवसेना प्रवेशाबाबत भाष्य केलं होतं. त्यावर, उत्तर देताना माझ्याशी कोणीही संपर्क साधला नाही, असे म्हणत धाराशिवमधील आमदार-खासदार फुटीची चर्चा देखील ओमराजे यांनी फेटाळली. संघर्ष आणि संकटाचा काळ आहे, या काळात आम्ही पक्षासोबतच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, धाराशिवचे खासदार आमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे शिवसेना पक्षफुटीनंतरही उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले. तर लोकसभा निवडणुकीत ओमराजे राज्यात दुसऱ्या क्रमांकाने सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत. तर, आमदार कैलास पाटील हेही विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. (Omraje Nimbalkar)
हेही वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.