दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
दिल्ली विधानसभा निवडणूक 2025: दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला असून या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या 10 वर्षाच्या साम्राज्याला जनतेने उलथवून लावलं आहे . दिल्लीत भाजप सरकार स्थापन होत असल्याने भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे . दरम्यान महाराष्ट्रात महायुती सरकारमध्ये असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्लीच्या निवडणुकीत 30 जागा लढवल्या होत्या .दिल्लीत अजित पवार गटातील सगळ्यांचे डिपॉझिट जप्त झालंय .0.03% मतं पक्षाला मिळाली आहेत .दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पराभूत होणाऱ्या पक्षाने आत्म परीक्षण आणि आत्मचिंतन करावं,जनतेचा कौल मान्य करावा लागतो.दिल्लीत भाजपला जनतेने संधी दिली.सर्व नेत्यांचे अभिनंदन करतो असं ते म्हणालेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवालांचा दारुण पराभव केलाय .याशिवाय आम आदमी पक्षासह अनेक दिग्गज दिल्लीत पराभूत झाले आहेत .महाराष्ट्रात महायुतीत असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला असून त्यांनी उभे केलेले 30 उमेदवार सपशेल आपटले आहेत .या उमेदवारांचा डिपॉझिटही जप्त झाला आहे . अजित पवार गटाला दिल्लीत केवळ 0.03 टक्के मते मिळाल्याने अजित पवार गटाला मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे .जुलै 2023 मध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी विभाजन झाल्यानंतर दिल्लीतील ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती .
अजित पवार गटाने कुठे कुठे उमेदवार उभे केले होते ?
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 30उमेदवार उभे केले होते .नवी दिल्ली ,कलकलजी ,करावल नगर यांसारख्या जागांवरही अजित पवारांचे उमेदवार होते . नवी दिल्ली मतदार संघातून विश्वनाथ अग्रवाल ,कलकाजी मतदारसंघातून जमील आणि करावल नगर मतदार संघातून संजय मिश्रा यांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देण्यात आलं होतं . बुरारी मध्ये रतन त्यागी ,बादलीमध्ये मुलायम सिंग ,चांदणी चौक -खालील रेहमान’ ,कस्तुरबा नगर सुरेंद्र सिंग हुडा ,अशा महत्त्वाच्या जागी अजित पवारांनी उमेदवार दिले होते .
राष्ट्रवादीतील विभाजनानंतरची पहिलीच निवडणूक
राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी महाराष्ट्र बाहेरील राज्य निवडणुका लढवल्या आहेत परंतु दिल्लीत त्यांना फारसे यश मिळाले नाही.2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागा लढवल्या होत्या .परंतु त्यातील एकही जागा त्यांना जिंकता आली नव्हती .जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभाजन झाल्यानंतर स्वतंत्रपणे अजित पवारांनी लढवलेली ही दिल्लीतील पहिलीच निवडणूक आहे .
हेही वाचा:
Delhi Election Result 2025: दिल्लीतील सर्व विजयी उमेदवारांची यादी; पाहा एका क्लिकवर
अधिक पाहा..
Comments are closed.